Homeक्राईमतोफखाना हद्दीत नेमकं चाललय काय दोन मर्डर एक हाफ मर्डर तरी सर्व...

तोफखाना हद्दीत नेमकं चाललय काय दोन मर्डर एक हाफ मर्डर तरी सर्व शांतताच… सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला होऊनही तोफखाना पोलिस धडा शिकले नाहीत… चोऱ्यांचे प्रमाण वाढतेय…तोफखाना हद्दीत खुलेआम सर्व अवैद्य धंदे जोरात सुरू…

advertisement

अहमदनगर दि.२७ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील वाढत्या चोऱ्या आणि त्याचा तपास न लागल्यामुळे भयभीत असलेले व्यापारी सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत चोरी होती सीसीटीव्ही फुटेज समोर येत. मात्र या चोरांचा तपास लवकर लागत नाही त्यामुळे चोरीला गेलेला माल अथवा पैसे मिळत नसल्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. बाजारपेठेतील चोऱ्यांचे तपास लागत नसल्यामुळे अखेर अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे उद्यापासून बाजारपेठेमध्ये उपोषणाला बसणार आहेत.

अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यात दोन खुनाच्या घटना घडल्या तर थेट सिताराम सारडा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि दारूबंदी चळवळीचे प्रमुख हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि हल्ला केल्यानंतर ते तक्रार देण्यासाठी गेले असतानाही त्यांना चार तास ताटकळत ठेवण्यात आले तर जेव्हा ते सामाजिक कार्यकर्ते आहे हे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रतिप्रश्न केला की तुम्ही एवढे मोठे माणूस आहात हे आधीच का सांगितले नाही यावरूनच तोफखाना पोलिसांची काम करण्याची पद्धत लक्षात येते. मारामारी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग, छेडछाड याची प्रकरणे वाढतच आहेत. गुन्हेगारीचा हा आलेख कमी न होता वाढतच चाललेला आहे.

एकीकडे सर्व अलबेल दिसत असले तरी तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैद्य धंदे जोरात सुरू असून पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर मटका जुगार तसेच बंदी असलेली सुगंधी सुपारी, मावा याची विक्री सर्रासपणे सुरू आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेमकं काय करतात हाच प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. शहरामध्ये तोफखाना पोलीस स्टेशन हद्द मोठी आहे. कर्मचारी कमी असल्याचे सांगत नेहमीच या गोष्टींवर पडदा टाकला जातो. रोजच्या होणाऱ्या काही घटनांना आळा घालण्याचे काम पोलीस करू शकतात. तोफखाना हद्दीतील परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस भुतकरवाडी परिसर तारकपूर परिसर पाईपलाईन रोड राज चेंबर परिसर या ठिकाणी मोठ मोठी टोळके रात्रभर उभे असतात तसेच रात्री बे रात्री फटाके वाजवून इतर नागरिकांची झोप उडवण्याचे काम हे टोळके करत असतात. तर आजकाल रोडवरच वाढदिवस करण्याचे नवीन प्रकार समोर आला असून रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करून फटाकडे फोडण्याचे प्रमाणही अलीकडच्या काळात वाढले आहे. त्यामुळे नेमकं पोलीस काय करतात हा प्रश्न आता उपस्थित राहतो. पोलिसांवर प्रचंड कामाचा व्याप असतो गुन्ह्याचा तपास आरोपी सापडणे हे सर्व जरी असले तरी पोलिसांना काम तर करावाच लागणार आहे. त्यामुळे ही तारेवरची कसर करताना गुन्हेगारी वाढणार नाही आणि गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी आता तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी थोडी मरगळ बाजूला ठेवून काम करणे गरजेचे आहे. अन्यथा तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशांतता निर्माण होऊ शकते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular