Homeशहरशहरातील सेतू चालकांकडून नागरिकांची आडवणूक जिल्हाधिकाऱ्यांना ए.आई.एम.आई.एम. विद्यार्थी आघाडीच्या वतीने निवेदन

शहरातील सेतू चालकांकडून नागरिकांची आडवणूक जिल्हाधिकाऱ्यांना ए.आई.एम.आई.एम. विद्यार्थी आघाडीच्या वतीने निवेदन

advertisement

अहमदनगर दि. १३फेब्रुवारी
अहमदनगर शाहरातील सेतू चालकांकडून सामान्य नागरिकांची अडवणूक होत असल्याची तक्रार ए.आई.एम.आई.एम विद्यार्थी आघाडीचे सनाउल्ला खान यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रशासनाच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्हयात, राज्यात व देशात आधारकार्ड बनविण्यात आलेले आहे. परंतू जर एकाद्या व्यक्तीच्या आधारकार्डमध्ये पत्ता अथवा इतर दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी शासनाने तयार केलेल्या फॉर्मवर खासदार, आमदार किंवा स्थानिक नगरसेवक यांचे लेटर पॅडवर सदर इसमाचा पत्ता नमूद करून दयवा असे देखील नमूद केलेले आहे.मात्र अहमदनगर शहरातील व्यक्तींना जर आपल्या आधारकार्डवर असलेला पत्ता बदलावयाचा असल्यास, शासनाने तयार केलेल्या फॉर्मवर नमूद केल्याप्रमाणे खासदार, आमदार किंवा स्थानिक नगरसेवक यांचा त्यांचे लेटर पॅडवर सदर इसमाचा पत्ता नमूद करुन दाखला असे गरजेचे आहे मात्र या सूचनेनुसार नगर शहरातील सेतू अगर इतर ऑनलाईन पध्दतीने करणारे व्यक्ती हे फक्त खासदार किंवा आमदार यांच्या कडील लेटर पॅडवर पत्ता नमूद करुन आणावयास सांगतात.शासनाच्या फॉर्मवर स्थानिक नगरसेवकांच्या लेटर पॅडवर पत्ता नमूद करुन आणल्यास सदर सेतू चालविणारे इसम हे स्वीकारीत नाही.

आमदार,खासदार यांच्याकडील लेटर पॅडवर पत्ता नमूद करुन मिळविणेकामी नागरीकांना बराच त्रास सहन
करावा लागतो व नागरीकांचे खुप हाल होत आहे.त्यामुळे
अहमदनगर शहरातील सेतू चालविणाऱ्या केंद्र चालकांना या बाबत सूचना द्याव्यात की शासनाच्या फॉर्मवर नमूद केलेल्या खासदार, आमदार अगर स्थानिक नगरसेवक यापैकी एका कोणाचेही पत्र पत्ता बदलविण्यासाठीचा दाखला आणल्यास तो स्वीकारण्यात यावा असा आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच याबाबत पंतप्रधान कार्यालय तसेच सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्रा (गृह) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular