अहमदनगर दिनांक 19 जुलै
आयुक्त साहेब सकाळी सकाळी दुर्गंध युक्त कचरा पाहायचं का देवाचे दर्शन घ्यायचे…ही परस्थिती आहे अहमदनगर शहराच्या महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या जवळील पंचपीर चावडी या परिसरातील या ठिकाणी अत्यंत दुर्गंध युक्त कचरा असतो रोज सकाळी उठले आणि घराबाहेर पडले तर नागरिकांना कचऱ्याचे दर्शनच घ्यावे लागते आणि तिथून पुढे काम सुरू करावे लागते मानवी जीवनात एक म्हण आहे की सकाळी सकाळी चांगल्या गोष्टींचे दर्शन घेतले तर दिवस चांगला जातो मात्र या ठिकाणी सकाळी सकाळी दुर्गंध युक्त कचऱ्याचे दर्शन घेऊनच येथील नागरिकांच्या दिवसाची खरी सुरुवात होते मग त्या माणसांचा दिवस किती चांगला जात असेल हे सांगायलाच नको हाच जर कचरा महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरासमोर ठेवला आणि त्यांना रोजच या कचऱ्याचे दर्शन घ्यायला मिळाले तर कसे वाटेल असा प्रश्न आता येथील नागरिक करू लागले आहेत.
विशेष म्हणजे महानगरपालिका कचरा संकलन करण्यावर करोडो रुपये खर्च करते मात्र कचरा उचलणाऱ्या घंटा गाड्या आणि कामगार हे नागरिकांशी उद्धट वर्तन करतात म्हणजेच उलटा चोर कोतवाल को दाटे अशी परिस्थिती सध्या नगर शहरात सुरू आहे. कचऱ्याची दुर्गंधी त्यामुळे या ठिकाणी कुत्र्यांची टोळी जमा होते सकाळी सकाळी अनेक मोकाट जनावर े या कचऱ्याच्या अवतीभोवती असतात या कचऱ्याच्या माध्यमातून या गाई म्हशींच्या पोटात प्लास्टिक ही जाते त्यामुळे मुक्या जनावरांनाही याचा त्रास होतो जिवंत माणसाबरोबर या ठिकाणी मुके जनावरही या कचऱ्याला बळी पडुन शकतात या ठिकाणी जिवंत नागरिक राहतात हे बहुतेक महानगरपालिकेला कळत नसावे असा मिश्किल सवाल या परिसरातील नागरिक करू लागले आहेत