HomeUncategorizedतोफखाना पोलिसांची मटका आणि गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे

तोफखाना पोलिसांची मटका आणि गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे

advertisement

अहमदनगर दि.२९ मार्च

अहमदनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज तोफखाना पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विकणारे तसेच मटका जुगार अड्डा चालवणाऱ्या धंद्यांवर कारवाई केली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

तोफखाना परिसरातील पंचरंग गल्ली येथे नितीन रायपल्ली यांच्याकडून सुमारे 25 लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच
जालिंदर बाबासाहेब बेरड वय 41 वर्ष राहणार रेणुका नगर बोलेगाव याच्या कडून 45 गावठी हातभट्टीची तयार दारु तर सोमनाथ बापूराव साळवे याच्या कडून 740/-रु रोख व कल्याण मटक्याचे साहित्य. आशिष साहेबा लोखंडे तपोवन रोड नाना चौक येथे एका पत्र्याच्या टपरीचा आडोशाला ५५०० रुपये किमतीची 55 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तर सूर्यकांत बन्सी शिरसागर हा मटका व्यवसाय करत असताना मिळून आल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके पोलीस हवालदार दत्तात्रय जपे, शिरसाट ,पोलीस नाईक अहमद इनामदार, वसीम पठाण, संदीप धामणे, सतीश त्रिभुवन ,संदीप गिरे, सचिन जगताप, सतीश पवार यांच्या पथकाने केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular