अहिल्यानगर दिनांक 4 नोहेंबर
महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून. १४ नोहेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक २२/११/२०२५ प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्याची तारीख ०६/१२/२०२५ असून मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करणे ०८/१२/२०२५ मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख १२/१२/२०२५ असून 15 डिसेंबर पासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






