अहमदनगर दि.२५ जुलै
नगर शहरातील मेलेले जनावरे मांस इत्यादीचे विल्हेवाट लावायचे काम अहमदनगर महापालिकेने ठेकेदाराला दिले आहे.मात्र बुरुडगाव येथील कचरा डेपो मध्ये असलेल्या विल्हेवाट प्रकल्पात गेल्या कित्येक दिवसांपासून पडलेल्या जनवारांच्या मांस ची विल्हेवाट लावली जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. फक्त नावालाच हा प्रकल्प आहे का असा सवाल निर्माण झालाय ? अनेक दिवसांपासून पडून राहिलेल्या मांसा मुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे सदरील ठेकेदाराला दैनंदिन तीनशे किलो प्रति तास याची विल्हेवाट लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट महापालिकेने या ठिकाणी असलेल्या ठेकेदाराला दिले आहे. मात्र हा ठेकेदार व्यवस्थित विल्हेवाट लावत नसल्याचे दिसून आले आहे. या विलेवाट प्रकल्पाच्या बाहेर अनेक ठिकाणी माणूस पडलेले दिसून येत आहे तर अक्षरशः या विल्हेवाट प्रकल्पाच्या पत्र्याच्या शेडला अळ्या लागल्या आहेत. आणि प्रचंड दुर्गंधीमुळे या ठिकाणी थांबणेही मुश्किल होते.
सध्या पावसाळा असल्यामुळे ओले झालेल्या मांस प्रचंड दुर्गंधी सोडत आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात ही दुर्गंधी पसरली असून यामुळे एखाद्या रोगाची लागण होऊ शकते या परिसरातील लोकांचे आरोग्यही यामुळे धोक्यात येऊ शकते.
या ठेकेदाराला महापालिकेकडून दरमहा तीन ते साडेतीन लाख रुपये बिल अदा केले जाते तरीदेखील संबंधित ठेकेदार आणि घनकचरा विभागातील महापालिकेचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे.
घनकचरा विभागातील एका अधिकाऱ्याची आणि संबंधित ठेकेदार यांची पार्टनरशिप असल्याची चर्चा आहे त्यामुळेच विल्हेवाट व्यवस्थित होत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत.
मात्र नगरच्या कररुपी जनतेचा पैसा असा वाया जात असेल तर याला जबाबदार कोण एकीकडे नागरिकांकडून महानगरपालिका कर भरून घेऊन तो पैसा गोळा करून ठेकेदाराच्या घशात घालण्यासाठी हा पैसा वापरला जातोय का ? असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.