अहमदनगर दिनांक २५ सप्टेंबर
अहमदनगर महानगरपालिकेची तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आज पुन्हा घेण्यात आली होती या सभेत नगर शहरातील बुजवलेले नाले ओढे यावरून प्रशासनाला सर्वच नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले होते मात्र याचे उत्तर देण्यासाठी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे काहीच उत्तर नव्हतं पाहू करू आणि समिती नेमुण चौकशी करू या पलीकडे महापालिका प्रशासन शेवटपर्यंत गेलीच नाही.
तर बोल्हेगाव परिसरातील रस्त्यावरून आज महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव तसेच राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आणि कुमार वाकळे यांनी महानगरपालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते या परिसरातील रस्ते अत्यंत खराब झाली असून अक्षरशा वडगाव वर पाण्यातून चालत जावे लागत आहे मात्र महानगरपालिका प्रशासन वेळ काढूपणा करत असल्यामुळे लोक अक्षरशा आम्हाला शिव्या घालतात आता लोकांना तोंड दाखवायला आम्हाला लाज वाटते मात्र प्रशासन रोड बाबत काहीच कारवाई करत नसल्यामुळे नागरिक काही दिवसांनी आम्हाला दगड मारतील असे संतप्त वक्तव्य नगरसेवक मदन आढाव यांनी केलं तर त्यांनी महानगरपालिकेच्या सभागृहात काही काळ आयुक्त आणि महापौरांच्या समोर मांडी घालून ठिय्या मांडला होता.
तसेच तृतीय पांथियांसाठी स्मशानभूमीची जागा देण्याचा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला तसेच पारधी समाज आणि नाहीतर समाजासाठी अंत्यविधी साठी जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी चर्चा करताना नालेगाव परिसरात यापुढे कोणतीही स्मशानभूमी होऊ देणार नाही आणि कुणीही याबाबत पत्र देऊ नये अन्यथा संपूर्ण नालेगावातील नागरिक घेऊन आम्ही त्या नगरसेवकाच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे तसेच नगरसेवक नळकांडे आणि नगरसेवक शिंदे यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आणि माळी समाजाला भूखंड देण्याबाबतचे पत्र महानगरपालिकेला देऊन अनेक दिवस झालेले आहेत मात्र महापालिका स्तरावर या जागे बाबत कोणतीही हालचाल नसल्याने या प्रश्नावर सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. या प्रश्नावर उद्या म्हणजेच मंगळवारी पुन्हा अकरा वाजता सभा घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे संपत बारस्कर यांनी सांगितल्यानंतर हा विषय अखेर उद्यावर ढकलण्यात आला आहे.
अहमदनगर शहराला दोन दिवसांपूर्वी पावसाने चांगलेच झोडपले होते या पावसामुळे अहमदनगर शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसून घरातील सामानाची नासधूस झाली तसेच अनेकांना रात्रभर जागून काढाव्या लागल्या याच सर्व खापर सर्व नगरसेवकांनी महानगरपालिका प्रशासनावर ठेवले असून महानगरपालिका आणि नगररचना विभाग नवीन लेआउट मंजूर करताना कसलीही शहानिशा न करता ओढे नाले बुजवाट असल्याचा आरोप यावेळी सर्व नगरसेवकांनी केला तर नगरसेवक योगीराज गाडे यांनी घरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झालेले आहेत याची जबाबदारी महानगरपालिकेने घेऊन अशा घरांचे पंचनामे करून त्यांना पाणीपट्टी आणि घरपट्टी मध्ये सूट द्यावी अथवा माफ करावी अशी मागणी यावेळी केली.