HomeUncategorizedजगात सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजप पक्षाच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात शेकडो कार्यकर्तेही...

जगात सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजप पक्षाच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात शेकडो कार्यकर्तेही नाही.. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत..

advertisement

अहमदनगर दि.२५ सप्टेंबर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रविवारी नगरमध्ये आले होते त्यांच्या उपस्थितीत नगर शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मात्र चंद्रशेखर बावनकुळे आले आणि गेले असेच म्हणता येईल कारण चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा म्हणजे फार्स होता का असं आता वाटू लागले आहे. राज्याचे आणि सर्वात मोठ्या पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नगरमध्ये आले असताना बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते म्हणजे शेकडो सुद्धा म्हणता येणार नाही एवढेच कार्यकर्ते काल नगर शहरात उपस्थित होते.त्या उलट ग्रामीण भागात झालेल्या कार्यक्रमात हजारो कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. नगर शहरातील अनेक गटतट यामुळे नगर शहरातील माणिक चौकातील कार्यक्रमांमध्ये कार्यकर्ते कमी आणि पदाधिकारी जास्त हे चित्र दिसून आलं तर सामान्य नागरिकांचा सहभागच नव्हता. भाजपमध्ये अनेक नेते असल्यामुळे कार्यकर्ते कमी झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात पाहायला सुद्धा चाळीस-पन्नास कार्यकर्ते सुद्धा उपस्थित नव्हते तिथून पुढे होणारी रॅली यावरूनच भाजपमध्ये अलबेल नाही हे लक्षात येतं. भाजपमध्ये नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी ही वस्तुस्थिती आहे.

तर नगर नगर तालुका आणि राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रचंड गर्दी होती या वेळी सुधा पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून चांगलीच घोषणाबाजी झाली थेट प्रदेश अध्यक्ष यांच्यासमोर दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली बाजू मांडली असली तरी हा मिटवण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अयशस्वी झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणात सभासद किती आहेत याचे मोठमोठे आकडे सांगितले पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेमध्ये जाऊन भाजपचा प्रचार करावा हे सांगताना भाजपचे विविध ॲप कसे डाउनलोड करायचे हेही सांगायला ते विसरले नाही मात्र नगर शहर विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहता भाजपला या ठिकाणी कार्यकर्ते जमा करावे लागतील अन्यथा फक्त पदाधिकाऱ्यांच्या जीवावर कोणतीही निवडणूक लढवणे सोपे नाही. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना शहरातील सर्व गट तटाच्या नेत्यांना एकत्र आणून एका व्यासपीठावर जोपर्यंत बसवण्यात ते यशस्वी होत नाही तोपर्यंत भाजप ताकदवान होणार नाही.देशात राज्यात भलेही भाजप ताकदवान असेल मात्र शहरात ही दिखवू ताकत असून यासाठी आता भाजपलाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

तर चंद्रशेखर बावनकुळे हे जाता जाता एक मोठे वादग्रस्त विधान करून गेले असून पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याची आता चांगली चर्चा होऊ लागली आहे यावेळेस त्यांनी थेट आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला देताना पत्रकारांना धाब्यावर न्या असं सांगितलंय. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलाय. बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी शहरात माहाविजय 2024 पदाधिकारी आणि कार्यकर्ता संवादात बोलताना त्यांनी हे विधान केल आहे मात्र या भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात पत्रकारांना प्रवेश नव्हता.

जनतेशी नाळ ठेवून पक्षाची वाढ होत असते मात्र भाजपमध्ये सध्या पदाधिकारी यांची नाळ एकमेकांशी जुळत नसल्याने जनतेशीं नाळ ठेवणे दूरच एकमेकांवर कुरघोडी करणे आणि नेता बनणे हेच सध्या सुरू असल्याचा दिसून येतेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular