अहमदनगर दि.१४ मे
देशामध्ये सध्या भाजपला सत्तेतून मागे हटवायचे असेल तर भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे ज्या एकत्रीकरणामध्ये महाविकास आघाडी सध्या महाराष्ट्र मध्ये काम करत असताना एमआयएम याबाबत काय विचार करते या प्रश्नावर उत्तर देताना एम आय एम चे छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की महाविकास आघाडी असेल किंवा इतर जे पक्ष असतील त्यांना मुस्लिमांचे मते लागतात मात्र मुस्लिम समाजाच्या एखाद्या नेत्याने नेतृत्व केलेले चालत नाही.
राष्ट्रवादीचे शरद पवार चालतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे चालतील किंवा काँग्रेसचा एखादा नेता चालेल मात्र खासदार ओवीसींसारखा मुस्लिम नेता चालणार नाही असं वक्तव्य करत त्यांनी पुढे ज्या नेत्यांना एमआयएमची ताकद भाजप विरोधी लढ्यात कुठेतरी मोठी वाटत असेल तर आम्ही भाजपला हटवण्यासाठी कोणतीही कुर्बानी देण्यास तयार आहोत. मात्र ज्याप्रमाणे मुस्लिमांचे मते चालतात त्याप्रमाणे मुस्लिमांचे नेतृत्व स्वीकारायला हवं असेही त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे.