अहमदनगर दि.१४ मे
जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल आम्ही ताकदवर आहोत तर त्यांनी आमच्याकडे यावे खा.ओवेसी यांचे नेतृत्व स्वीकारावे तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ असे वक्तव्य संभाजी नगरचे एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अहमदनगर येथे बोलताना केले आहे.
भाजपला हरवण्यासाठी देशातील जे जे लोक प्रयत्न करत आहेत त्या लोकांसाठी आम्ही आमच्याकडून जी पाहिजे ती कुरबानी देण्यासाठी तयार आहोत असेही वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केले आहे.
संभाजीनगर येथील दंगल ही नियोजित होती असा स्पष्ट आरोप त्यांनी केला असून या दंगलीच्या पाठीमागे राज्यातील सत्ताधाऱ्यांसह इतर पक्ष सामील असून ज्या दिवशी ही दंगल घडली त्यादिवशी संभाजीनगर मधील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे होते आणि काय करत होते याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर सर्व काही सत्य समोर येईल आम्ही याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून आम्हाला फक्त दोन ओळीचे उत्तर मिळाले असून यावरूनच त्यांची मानसिकता समोर येते असेही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलेय.
तर कालीचारण महाराजांसारखे भगव्या कपड्यातील गुंड असून त्यांची जागा जेल मध्ये आहे आम्हाला बोलायची परवानगी द्या मग पाहू कोण जिंकतय या लोकांना भगव्या कपड्याच्या अडून राज्यात देशात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे असेही वक्तव्य खा.इम्तियाज जलील यांनी केलं आहे.