अहमदनगर दि.१४ मे
छत्रपती संभाजी नगरचे एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी आज अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना कालीचरण महाराज यांच्यावर जहरी टीका केली होती. योगायोगाने कालीचरण महाराज आज अहमदनगर मध्ये आले असताना त्यांनी यावर बोलताना सांगितले की हत्ती चालत असताना कुत्रे हे भुंकणारच आम्ही आमचे काम करतच राहू कोणी आडवे आले तर त्याला बाजूला हटवून काम करू सत्य सांगण्याचा आमचा धंदा आहे असं प्रत्युत्तर कालीचारण महाराज यांनी दिले आहे तर त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत त्यांनी सांगितले की ते काम वकिलाचे आहे ते वकील पाहून घेईल तसेच द केरला स्टोरी हा चित्रपट सर्व हिंदू धर्मातील लोकांनी पाहिला हवा असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ज्या लोकांमुळे हिंदूजागृती होती वोटरबँके मध्ये परावर्तित होतात त्या सर्व प्रवक्त्यांना संघटनांना लक्ष करून त्यांच्यावर बंदी आणण्याचे किंवा गुन्हे दाखल करण्याचे काम करतात असेही त्यांनी स्पष्ट केले.