Home क्राईम अहमदनगर शहरातील अंजूमने तरक्की उर्दू  ट्रस्ट संस्थेच्या(चाँद सुलताना)  कारभार हाती घेण्यासाठी बंदोबस्त...

अहमदनगर शहरातील अंजूमने तरक्की उर्दू  ट्रस्ट संस्थेच्या(चाँद सुलताना)  कारभार हाती घेण्यासाठी बंदोबस्त द्यावा नवीन विश्वस्तांची पोलिसांकडे धाव

अहमदनगर दि.११ ऑक्टोबर

अहमदनगर शाहरतील चाँद सुलताना हायस्कुलचा नवीन विश्वस्तांची नेमणूक झाली असून या विश्वस्तांना शाळेचा कारभार चालु करण्यासाठी शाळेच्या परिसरात जाण्यासाठी  पोलिसांचा बंदोबस्त मिळावा अशी मागणी  अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या कडे नवीन विश्वस्तमंडळाने केली आहे.

धर्मादाय उपायुक्त साहेब, अहमदनगर यांचे कोर्टात
बदल अर्ज क्र. १३३२/२०२२ या बदल अर्जावर दिनांक ३०/०९/२०२२ रोजी मंजूर करण्यात आला आहे. त्या  विश्वस्त मंडळाला संस्थेचा कारभार हाती घेण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात जाण्यासाठी पोलिसांकडे बंदोबस्त मांडण्याची वेळ आली आहे कारण  त्या ठिकाणी काही गुंडप्रवृत्तीचे लोक तसेच स्वयंघोषीत चेअरमन त्या ठिकाणी गुंडासाहित तळ ठोकन बसले आहेत. ते गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणीवकायदा सुव्यवस्था खराब करुन व मोठा घातपात करतील तसेच त्यांच्या गाड्यांमध्ये हत्यारे असून अशा लोकांपासून संरक्षण मिळावे अशी मागणी नवीन विश्वस्त मंडळाने अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेऊन केली आहे.

यावेळी अपर पोलीस अधीक्षकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांची नावे देण्यात आली असून मागील आठवड्यात आयुक्तांकडे अर्ज दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला जीवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रकरणातील आरोपी हेच या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडवतील असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी चेअरमन  सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहिम,व्हा.चेअरमन  खान समद वहाब शेख तन्वीर चाँद – सेक्रेटरी, गुलजार हुसेन दिलदार हुसेन शेख – जॉईंट सेक्रेटरी,सय्यद सादीक आरिफ – जॉईंट सेक्रेटरी, रेहाना रशिद अहमद शेख ट्रेजरर, शेख रशिद सुलेमान – विश्वस्त, बेग समीर मकसूद – विश्वस्त, शेख अकिल लियाकत – विश्वस्त, शेख गुलाम दस्तगीर अब्दूल गणी विश्वस्त, सय्यद इसहाक अहमद – विश्वस्त,सय्यद जमीलोद्दीन शफीउद्दीन विश्वस्त,शेख खालीद दिलदार हुसेन – विश्वस्,सय्यद अब्दूल वाहीद अब्दुल हमीद – स्विकृत विश्वस्त, सय्यद वहाब उमर – स्विकृत विश्वस्त उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version