HomeUncategorizedआर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस नगर शहरात उत्साहात...

आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस नगर शहरात उत्साहात साजरा..आर्ट ऑफ लिविंगच्या माहिती विषयीचा नवीन युट्युब चॅनेलचा शुभारंभ …

advertisement

अहमदनगर दि .१७ मे
श्री श्रीं च्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहिल्यादेवीनगर येथे आर्ट ऑफ लिविंगच्या नवीन युट्युब चॅनेलचे भव्य उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक सलील पुळेकर यांच्या हस्ते आणि आर्ट ऑफ लिविंगचे सर्व प्रशिक्षक व साधक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात आर्ट ऑफ लिविंगचे साधक, प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री श्री रविशंकरजी यांचा 13 मे रोजी वाढदिवस असल्याने पहाटे सहा ते साडे आठ वाजेपर्यंत गावडे मळ्यातील ध्यान मंदिरात सुदर्शन क्रिया घेण्यात आली. त्यानंतर दिवसभर सर्वांसाठी खुले असलेले रक्तदान शिबिर, मोफत रक्त तपासणी शिबिर, डोळे व दंत तपासणी शिबिर, नाडी परीक्षण असे लोकउपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. या शिबिरांचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला.

la

सायंकाळी यूट्यूब चॅनल चे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक सलील पुळेकर यांच्या हस्ते आणि आर्ट ऑफ लिविंग च्या नगर येथील प्रशिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यूट्यूब चॅनलला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या चॅनलच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत आर्ट ऑफ लिविंगच्या होणाऱ्या व झालेल्या कार्यक्रमाबाबतची तसेच कोर्सची माहिती पोहोचवण्यात सहकार्य मिळणार आहे.

सायंकाळी नगर येथील प्रतिथ यश गायक गिरीराज जाधव यांच्या सुमधुर वाणीतून श्री गणेशाच्या सत्संगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सलील पुळेकर यांनी देखील विविध सत्संग गायली. या सत्संगाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पुरुष,महिला उपस्थित होते नागरिकांनी या सत्संगाचा आनंद लुटला.कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व साधकांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आर्ट ऑफ लिविंगच्या चॅनलला सबस्क्राईब करायसाठी लिंक.

https://images.app.goo.gl/8GebXMpbxrpxp5L87

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular