HomeUncategorizedअवैद्य बायोडिझेल विक्री पुन्हा सुरू.. छोट्या मोठ्या हॉटेल वरून चोरीछुपे बायोडिझेल विक्री...

अवैद्य बायोडिझेल विक्री पुन्हा सुरू.. छोट्या मोठ्या हॉटेल वरून चोरीछुपे बायोडिझेल विक्री साखळी पुन्हा कार्यरत

advertisement

अहमदनगर दि.२७ ऑगस्ट

अहमदनगर शहराच्या आजूबाजूला रिंग रोड परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी अवैद्य बायोडिझेल विक्री रॅकेट पोलिसांनी पकडले होते या रॅकेटची व्याप्ती फार मोठी होती या रॅकेटमध्ये मोठ मोठ्या हस्तींची नावेही समोर आले होते.

एवढेच नव्हे ते अहमदनगर जिल्ह्यातील अनेक महामार्गांवर बायोडिझेल विक्रीचे केंद्र सुरू होते मात्र पोलिसांनी मोठी कारवाई केल्या नंतर हे उद्योग थांबले असल्याचे दिसत असले तरी चोरीछुपे पुन्हा नगर शहराच्या आसपास बायोडिझेल विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

महामार्गांवरून लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणाऱ्या ट्रक चालकांना सांकेतिक भाषेतून बायोडीझेल कुठे मिळेल हे सांगण्यासाठी काही ठराविक हॉटेलमध्ये एजंट फिरत असतात या माध्यमातून ठरविक हॉटेलमध्ये या बायोडिझेलची विक्री सुरू असते.

तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मोठ्या कारवाई करत बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली होती. अनेक आरोपी जेलमध्ये गेले होते मात्र मध्यंतरी थंडावलेल्या बायोडिझेल विक्री करणाऱ्या साखळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

नगर तालुका हद्दीतील काही मोकळ्या हॉटेलवर सध्या चोरीछुपे जोरात बायो डीझेल विक्री सुरू असल्याचे समजतंय त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular