अहमदनगर दि.२७ ऑगस्ट
अहमदनगर शहरात ताबा हा प्रकार आता नवीन राहिला नाही अनेक नागरिक या ताब्याच्या जंजाळात अडकले आहेत. ताबे फक्त गरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या जागेवरच मारले जातात हा भ्रम खोटा आहे. ताबे गडगंज श्रीमंत असलेल्या लोकांच्या जागेवरही मारल्याचे प्रकरण नगर शहरात नवीन नाहीत पोलिसांची कटकट, न्यायालयात लढावा लागणारा दीर्घ लढा यामुळे गर्भ श्रीमंत लोक ताबा मारणाऱ्यांना काहीच रक्कम देऊन आपला प्लॉटचा ताबा सोडून घेतात मात्र सर्वसामान्य माणसाल अखेर पर्यंत लढाच द्यावा लागतो. ताबा मारल्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हा प्रकार दिवाणी स्वरूपाचा असल्यामुळे कोर्टात जा हे सरळ सरळ उत्तर अनेक वेळा पोलिसांकडून मिळते आणि तिथूनच त्या प्लॉट धारकाचा भ्रमनिरास होतो तिथून पुढे कोर्ट कचेरी किंवा एखादा मध्यस्थी यामुळे तो पुरता वैतागून जातो.
ताबा म्हणजे फक्त मोकळ्या प्लॉटवरच नाही तर एखाद्याला त्रास देऊन घर विकायला लावणे हा एक प्रकारचा मानसिक छळ करून ताबा घेण्याचा प्रकार आहे.
असाच काहीसा प्रकार सावेडी उपनगरामध्ये घडला असून एका प्रतिष्ठित डॉक्टरचे घर विकणे आहे अशी जाहिरात पेपरला देऊन त्यांचा मानसिक छळ करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका पेपर मध्ये सर्व वस्तूंनी परिपूर्ण असे घर विकणे आहे अशी जाहिरात देऊन पत्त्यासह एका डॉक्टरांचे नाव आणि नंबर देण्यात आला जेव्हा सुरुवातीला काही लोकांचे फोन त्या डॉक्टरांना आले तेव्हा त्यांना वाटले कोणीतरी चेष्टा करत आहे मात्र जेव्हा त्यांच्या घराची विकणे आहे या माथळ्या खालील जाहिरातच डॉक्टरांच्या समोर आली तेव्हा डॉक्टरांच्या पायाखालची वाळू सरकली होती.
यानंतर त्या डॉक्टरांनी संबंधित पेपरच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही कोणीतरी ही जाहिरात देऊन गेले एवढेच माहिती त्यांच्या पदरी पडली. मात्र या प्रकारामुळे त्या डॉक्टरांच्या घरातील सर्वच माणसे भयभीत झाले होते. अनेक दिवस डॉक्टरांच्या कुटुंबातील इतर सदस्य मानसिक दबाव खाली वावरत होते घरातील वातावरण विस्कळीत झाले होते तर अनेक लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता डॉक्टरही वैतागून गेले होते कारण जाहिरात मित्रांपासून तर नातेवाईक पर्यंत सर्व दूर पोहोचली होती.
या प्रकरणाची वाच्यता कोणाकडे करायची पोलिसात जाऊन काय तक्रार द्यायची तक्रार दिली तरी कोणाबद्दल द्यायची या संभ्रम अवस्थेत त्या डॉक्टरांचे कुटुंब होते. अनेक वेळा पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन डॉक्टर माघारी फिरले होते कारण तिथे गेल्यावर अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावे लागणार होते मात्र त्यांच्याकडे उत्तरच नसल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पाय ठेवायचे धाडस केले नाही.
हा प्रकारही मानसिक छळ करून ताबा मारण्याचा असल्यासारखा आहे. एखादे सदन कुटुंब सुशिक्षित कुटुंब खेळीमेळीच्या वातावरणात राहत असेल आणि अचानक अशा प्रकारे त्याला धक्कादायक गोष्ट समजत असेल तर त्या घरातील लोकांची मानसिक स्थिती कशी असेल हे सांगायलाच नको. अशाप्रकारे ही नगर शहरात मानसिक छळ करून ताबा मारण्याचा प्रकार घडला असून यामुळे त्या डॉक्टरांचे संपूर्ण कुटुंब तणावात आहे.
यामध्ये एक मुद्दा मात्र अधोरेखित करण्यासारखा आहे.जाहिरात देणाऱ्याचे नाव आणि पत्ता घेत असताना जो माणूस जाहिरात देण्यासाठी येत असेल त्याचे ओळख पत्र सुद्धा आता घेणे गरजेचे आहे कारण कोणी कोणाच्या नावाने जाहिरात देऊन असा मानसिक छळ करत असेल या प्रकारामुळे एखाद्याचे कुटुंब उध्वस्त होऊ शकते त्यामुळे जाहिरात देणाऱ्यावरही तेवढीच जबाबदारी असते की त्यांनी काही नियम पाळणे गरजेचे आहे.
ताबा – वाचत रहा … केडगाव मध्ये तो ताबा मारू आनंद कोण?