अहमदनगर दि.५ जानेवारी
भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शहापूर गावात झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले होते तर याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सोमनाथ भानूदास बेरड यांच्या फिर्यादी वरून शरापुर गावचे सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग यांच्या विरोधात भा द वि कलम307,352,452,323, 504, 506,34 सह आर्म अँक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणाची हकीकत अशी की शहापूर येथील सोमनाथ भानूदास बेरड यांच्या घरासमोर राहणारे शरापुर गावचे सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग यांनी दोन जानेवारी रोजी हातात लोखंडी कोयता व लोखंडी तलवार घेऊन बेरड यांच्या घरात घुसून मारहाण केली होती.तर सोमनाथ यांचा भाऊ सतिष बेरड हा या झटापटीत तलवारीने केलेल्या हल्ल्यात जखमी झाला होता.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या नंतर शरापुर गावचे सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग फरार होते.
भिंगार पोलीस ठाण्याचे सहह्याक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एम के बेंडकोळी, पोहेकाँ गोविंद जठार,पोहेकाँ/शफीक
शेख, पोहेकाँ/रेवनाथ मिसाळ, पोहेकाँ/गणपत जठार, पोना राहुल द्वारके, पोना खेडकर, पोना राहुल गोरे, पोकाँ/महादेव निमसे, पोकाँ/रमेश दरेकर, चापोकाँ/संजय काळे यांनी या आरोपींना शोधण्यासाठी साठी सापळा रचला आणि सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग यास सैनिक नगर, डेअरी फार्म, भिंगार येथून ताब्यात घेतले तर संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंगयास नगर मनमाड रोड वरील सावेडी येथून ताब्यात घेतले
दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयानेत्यांना 02 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,मा.उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पो. स्टे. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमर देशमुख, पोसई एम के बेंडकोळी, पोहेका गोविंद जठार,पोहेकाँ/शफीक शेख, पोहेकाँ/रेवनाथ मिसाळ, पोहेकाँ/गणपत जठार, पोना राहुल द्वारके, पोना खेडकर, पोनाराहुल गोरे, पोकाँ/महादेव निमसे, पोकाँ/रमेश दरेकर, चापोकाँ/संजय काळे यांनी सदरचीकारवाई केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई/एम के बेंडकोळी हे करीत आहेत.