अहमदनगर दि.५ ऑगस्ट
नगर पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथील एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी कैलास स्वामी पूर्ण नाव माहीत नाही याच्या विरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बाराबाभळी येथील गोविंदधाम प्रियदर्शनी शाळेजवळ राहणाऱ्या एका 24 वार्षिय महिलेच्या घरी फर्निचरचे काम सुरू होते या कामासाठी गेल्या एक महिन्यापासून कैलास स्वामी हा काम करण्यासाठी येत होता 3 ऑगस्ट रोजी कैलास स्वामी याने घरात कोणी नाही हे पाहून विवाहित महिलेच्या बेडरूममध्ये प्रवेश करून माझे तुझेवर खूप प्रेम आहे असे म्हणुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
मात्र त्या महिलेने प्रतिकार केल्याने कैलास स्वामी पळून गेला या प्रकरणी त्या विवाहित महिलेने कॅम्प पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली असून कैलास स्वामी याच्या विरोधात भादविक ३५४, ३५४ (ब), ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख हे करत आहेत.