अहमदनगर दिनांक २८ नोव्हेंबर
तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घेऊन जाणे म्हणजे मनस्ताप आशीच काहीशी परिस्थिती सध्या असून चोर सोडून संन्याशाला फाशी आणि चोराला सलाम या म्हणीचा प्रत्यय तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये येतोय तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व बेकायदेशीर धंदे सुरूच आहेत. मात्र याबरोबरच तोफखाना पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत. मध्यंतरी एका दुकानदाराच्या मुलाची सायकल त्याच्या दुकानात समोरून चोरी गेली होती सायकल चोरी गेल्यानंतर सायकल चोरीचा तपास करताना शेजारी असल्या दुकानाच्या सीसीटीव्ही माध्यमांद्वारे चोर कोण आहे याची ओळख ही झाली पुढे या सीसीटीव्ही च्या माध्यमातून चोराला पकडण्यातही आले. याबाबत सर्व पुरावे सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपी कुठे असेल याची माहिती ही सायकल चोरीला गेलेल्या इसमाने पोलिसांना दिली मात्र फिर्यादीलाच अनेक चकरा माराव्या लागल्या अखेर सायकल नको पण चक्कर आवरा असे म्हणण्याची वेळही या दुकानदारावर आली होती. अखेर सायकल परत भेटण्याची वेळ आली मात्र तेव्हा तपासी अंमलदाराने थेट दुकान तुमचेच आहे का यासाठी शॉप ॲक्ट लायसन आणून दाखव असे फर्मान काढले आणि जेव्हा शॉप ॲक्ट लायसन आणून दाखवले तेव्हा चोरीला गेलेली सायकल त्या इसमाला परत मिळाली सायकल मिळवण्यासाठी मारण्यात आलेले खेटे पाहता त्यापेक्षा सायकल चोरीला गेलेली परवडली असती असा उपरोधक टोलाही त्यांनी यावेळी मारला.
दुसऱ्या एका प्रकरणात एका ठिकाणी बोरिंगची मोटर चोरत असताना सिक्युरिटी गार्डने चोरट्यांना पकडले होते आणि त्या चोरट्याला पोलीस स्टेशनला आणले तर पोलिसांनी चोरा ऐवजी सिक्युरिटी गार्ड ची उलट चौकशी करून तुम्ही यांना हात लावला नाही ना नाहीतर यांचीही तक्रार आम्हाला घ्यावा लागेल असे पहिल्यांदा सुनवले. सिक्युरिटी गार्डलाही पस्तावा झाला की आपण त्या ठिकाणीच या चोरला सोडले असते तर बरे झाले असते.
अशी परिस्थिती सध्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये सुरू असून वरिष्ठांचा धाकच नसल्याने हा सर्व प्रकार समोर येत आहे. सर्व अवैध धंदे सुरू असून न्यायालयाने बंदी घातलेल्या ऑनलाईन लॉटरीचे दुकाने तोफखाना हद्दीत सुरू आहे मात्र पोलीस जाता येता याकडे पाहुण न पाहिल्यासारखे करतात. दर महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत असते अनेक तरुणांचे कष्टाचे पैसे वेगवेगळ्या लॉटरी चालकांच्या खिशात जात आहेत मात्र पोलीस यावर कारवाई करत नाही याचे गौड बंगाल अजूनही कळाले नाही एकंदरीत पाहता तोफखाना पोलीस स्टेशनची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली असून वरिष्ठांकडे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.