Homeशहरभाजपा नगर शहर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अ‍ॅड.अभय आगरकर ? सोशल मीडियावर फिरणारी...

भाजपा नगर शहर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अ‍ॅड.अभय आगरकर ? सोशल मीडियावर फिरणारी ती यादी खरी की खोटी ?

advertisement

अहिल्यानगर 17 मे
अहिल्यानगर भाजप शहरजिल्हाध्यक्षपदाचा तिढा अद्यापही सुटला का नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. काही वेळा पासून सोशल मीडियावर पदाधिकारी निवड झाल्याची एक यादी चांगलीच व्हायरल होत असून यामध्ये लाल अक्षरात नगर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून
अ‍ॅड.अभय आगरकर यांचे नाव दिसून येत आहे. मात्र ही यादी कोणी जाहीर केली याबाबत अद्यापही कोणतीही माहिती मिळाली नसली तरी ही यादी म्हणजे लाल अक्षरात ज्या ठिकाणची नावे आहेत त्या ठिकाणी अद्यापही शहरजिल्हाध्यक्ष पदाचा तिढा सुटला नसल्याचे संकेत असल्याचे काही जाणकारांचे मत आहे. तर ही यादी अधिकृत असल्याचे काही भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत आहे.

भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी या वेळेस मोठी रस्सीखेच दिसून आली त्यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघातील शहरजिल्हाध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात उशीर होत आहे. या पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे,शहर उपाध्यक्ष सचिन पारखी, धनंजय जाधव, यांच्यासह विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर हे देखील पुन्हा इच्छुक होते.

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर जाहीर झालेली यादी ही अधिकृत आहे का नाही किंवा पुन्हा एकदा अभय आगरकर यांची निवड जाहीर झाली याबाबत अद्यापही कोणतीही खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular