Homeशहरचांदबीबी महल परिसरात भल्या मोठ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन फिरायला जाणाऱ्यांनी सावधगिरी पाळण्याची...

चांदबीबी महल परिसरात भल्या मोठ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन फिरायला जाणाऱ्यांनी सावधगिरी पाळण्याची गरज..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 16 मे

अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे बिबटे आता मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहेत.त्यामुळे मानवी जीवनात सह पाळीव प्राण्यांचे जीवन संकटात पडले आहे.

पारनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका घोड्याचा मृत्यू झाला असून शेळ्या तसेच शेतकऱ्यांचे पशुधन बिबटे फस्त करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या जीवासह आपल्या पशुधनाची चिंता लागली असून शेतकऱ्यांनी पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.

जंगल नष्ट होत असल्यामुळे बिबट्या आता मानवी वस्तीत फिरताना दिसण्याचे चित्र नेहमीच दिसते. अहिल्यानगर शहराच्या जवळ असलेल्या चांदबिबी महाल परिसरात अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होत असते. आज संध्याकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास नगर मधील काही नागरिक चांदबीबी महालावर फिरण्यासाठी निघाले असताना चांदबीबी महाल डोंगरावर जात असताना रोडवर त्यांच्या चार चाकी वाहनासमोर बिबट्याने रस्ता ओलांडल्याने काही वेळ चार चाकी मधील नागरिकांची भीतीने थरकाप उडाला होता. अचानक बिबट्या दिसल्याने चित्रीकरण करण्यासाठी खिशातून मोबाईल काढल्यावरही रेकॉर्डिंग करण्याची करण्यासाठी हात थरथर कापू लागले होते. अशी प्रत्यक्षदर्शिनी माहिती दिली. बिबट्यानेही रुबाबात रस्ता ओलांडून पुन्हा त्या नागरिकांकडे पाहत पुढे धूम ठोकली. अचानक मला मोठा बिबट्या समोर आल्याने चारचाकी वाहनातील नागरिक चांगलेच घाबरून गेले होते. त्यामुळे चांदबिबी महल परिसरात फिरायला जाताना नगरकरांनी पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular