अहमदनगर दि.२२ सप्टेंबर
गौरी गणपतीच्या आगमनामुळे प्रत्येक कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होत असते,गौरी गणपती सणाला समाजामध्ये धार्मिक मोठे महत्व आहे.आपण सणउत्सव मोठे उत्साहात साजरे करावे यामाध्यमातून आपली संस्कृती जोपासण्याचे काम केले जाते. सणाला अध्यात्मिक व धार्मिकतेचा वारसा लाभलेला आहे. दरवर्षी डोके परिवाराच्या वतीने मोठे उत्साहात व आनंदात साजरा केला जातो यामाध्यमातून नातेवाईक व मित्र परिवार एकत्र येत असून ऋणानुबंध निर्माण होत असते. गौरी गणपतीचा वारसा पुढच्या पिडीला समजण्यासाठी उत्साहात साजरे करावे असे प्रतिपादन दैवशाला डोके यांनी केले.
पाइपलाईन रोड हनुमान नगर येथे डोके परिवाराच्या वतीने पारंपारिक पद्धतीने गौरी गणपतीचा उत्सव साजरा केला. यावेळी दैवशाला डोके,शिवाजी डोके,स्नेहा डोके आदीसह नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैवशाला डोके पुढे म्हणाले कि, गौरी गणपती समोर आकर्षक फुलांनी सजावट केली जाते पारंपारिक पद्धतीने आरस तयार करून समाजामध्ये प्रभोधन केले जाते. गौरी गणपतीच्या सणाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये गौरीच्या आगमनामुळे आनंदी वातावरण निर्माण होते. तीन दिवस आगमन करणाऱ्या या गौरीसाठी छानशी फुलांची सजावट केली जाते. त्याचबरोबर कलाकुसरीच्या वस्तू गौरी गणपती समोर ठेवला जातात, या सणाला पारंपारिक महत्त्व आहे. ज्येष्ठ नक्षत्रावरती महालक्ष्मीची पूजा करतात.गौरीची स्थापना करताना घरासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते, त्याचबरोबर तुळशीचे पूजन करून गौरीचे घरामध्ये आगमन करून स्थापना केली जाते.