HomeUncategorizedभारतीय जनता पार्टीची लोकसभा निवडणूक उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

भारतीय जनता पार्टीची लोकसभा निवडणूक उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

advertisement

दिल्ली दिनांक २ मार्च
भारतीय जनता पार्टीने आज लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत तर अमित शहा गांधीनगर मधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत पहिल्या यादीत 34 मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर 28 महिलांना या यादीत स्थान मिळाले आहे .जवळपास 16 राज्यातील 195 उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर केली असली तरी महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव या यादीत नसल्याने महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची धाकधूक मात्र वाढली आहे.

पहिल्या यादीत कोणत्या राज्यातून किती उमेदवार घोषित :

उत्तर प्रदेश – 51
गुजरात – 15
पश्चिम बंगाल – 20
मध्य प्रदेश – 24
राजस्थान – 15
केरळ – 12
तेलंगणा – 9
आसाम – 11
झारखंड – 11
छत्तीसगढ – 11
दिल्ली – 5
जम्मू काश्मीर – 2
गोवा – 1
अरुणाचल प्रदेश – 1
अंदमान निकोबार – 1
भाजपच्या पहिल्या यादीतील मोठी नावं
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular