Home शहर भाजपच्या खासदारांनी स्टंटबाजी न करता जनतेचे काम करावे केंद्रात राज्यात सत्ता असूनही...

भाजपच्या खासदारांनी स्टंटबाजी न करता जनतेचे काम करावे केंद्रात राज्यात सत्ता असूनही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन निधी मागण्याचा हा स्टंटच… युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड

अहमदनगर दि. 7 डिसेंबर

अहमदनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज नगर पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी नगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत आमरण उपोषण सुरू केले आहे. नगर पाथर्डी,शेवगाव तसेच नगर शिर्डी कोपरगाव आणि नगर मिरजगाव टेंभुर्णी अशा विविध रस्त्यांची दूरदर्शा झाली असून अनेक दिवसांपासून या ठिकाणी रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी या भागातील नागरिकांची होती. मात्र अनेक वेळा आंदोलन निवेदन देऊनही हे मागणी पूर्ण होत नसताना अखेर आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांसह पाथर्डी शेवगाव राहुरी कर्जत तालुक्यातील ग्रामस्थांबरोबर उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाचा इशारा त्यांनी आधीच दिला होता यावेळी त्यांचे नाव न घेता अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी ही स्टंटबाजी करू नका काम लवकरच सुरू होईल असे सांगितले होते. यावर आज आमदार निलेश लंके यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून लंके नव्हे तर खासदार स्टंटबाजी करत आहेत तुमची राज्यात केंद्रात सत्ता असताना घरात मंत्रिपद असताना राज्यात भाजपचा उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शहरासाठी 25 कोटी रुपयांची निधी मागण्याचे जे नाटक केला आहे त्याला स्टंटबाजी म्हणतात असा जोरदार हल्ला युवा सेनेचे अध्यक्ष विक्रम राठोड यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर केला आहे.
पहा व्हिडीओ

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version