Home देश BREAKING NEWS: अमरनाथ गुहेजवळ ढग फुटी, गुहेजवळ 10 ते 15 हजार भाविक;...

BREAKING NEWS: अमरनाथ गुहेजवळ ढग फुटी, गुहेजवळ 10 ते 15 हजार भाविक; 5-6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

जम्मू काश्मीर दि. ८ जुलै
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. ज्या वेळी ढगफुटीची बातमी मिळाली, त्या वेळी 10 ते 15 हजार भाविक गुहेजवळ उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी केवळ दोन जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

अमरनाथ गुहेपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिघात ढगफुटीची घटना घडली. डोंगरावरून आलेल्या जोरदार प्रवाहाने आलेल्या पाण्याने भाविकांसाठी उभारलेले सुमारे 25 तंबू आणि दोन लंगर वाहून गेले. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेकांच्या सामानाचे नुकसान झाले. घटनेनंतर लगेचच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने लष्कर, आयटीबीपी, सीआरपीएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असून त्यांना छावण्यांमध्ये नेण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version