HomeUncategorizedप्रशासनाने आता कॅफे हाऊसपेक्षा लॉजिंगलाच परवानगी देऊन टाका... आणि शहरात गुटखा, मावा,...

प्रशासनाने आता कॅफे हाऊसपेक्षा लॉजिंगलाच परवानगी देऊन टाका… आणि शहरात गुटखा, मावा, हुक्का पार्लर सरकार मान्य करून टाकावेत… तरुणांना बिघडवण्यास सरकारी अनस्था कारणीभूत.. शाळेच्या ड्रेसवर मुलं मुली त बंद पडद्या जातात हे पाहताना.. पैसे घेणाऱ्यांनाही लाज वाटत नसेल का?

advertisement

अहमदनगर दि.२४ डिसेंबर सुथो..

तरुण पिढीला बिघडवणाऱ्या गुटखा, तंबाखू आणि कॅफे हाऊस बंद करण्यासाठी आता पालकांनीच जागृत होणे गरजेचे आहे. कारण हे काम सरकारी बाबू करू शकत नाही हे अनेक घटनांवरून समोर आले आहे सरकारी काम आणि थोडं थांब अशी अनास्था सध्या सरकारी कार्यालयांमध्ये असून आम्हाला काय एवढेच काम आहे का? इतर कामही आम्हाला करावे लागतात असे उत्तर सरकारी कार्यालयातून मिळत असल्याने आपल्या मुलांना वाचवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.(sutho)

अन्न औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोघांमध्ये कारवाई कुणी करायची या ढकलाढकलीच्या कारणामुळे नगर शहरात अवैध मावा विक्री आणि परराज्यातून येणारा विषारी गुटखा संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकला जात आहे. अन्न औषध प्रशासनाकडे मनुष्यबाळा अभावी कारवाई करता येत नसल्याचे कारण आहे तर हे काम आमचं नाही यासाठी अन्न औषध प्रशासनाची गरज असते असे सांगून पोलिस हात वर करतात मात्र थोड्याफार प्रमाणात स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाया होताना दिसतात मात्र स्थानिक पोलीस स्टेशन मधून कधीतरी एखादी कारवाई केल्याचा समोर येतं. (सुथो)

ज्याप्रमाणे मावा आणि गुटखा हे तरुणांना व्यसनासह कॅन्सर सारख्या आजाराकडे घेऊन जात आहे त्याचप्रमाणे यापेक्षाही भयानक प्रकार सध्या तरुण आणि कोवळ्या वयात आयुष्य उध्वस्त होण्याचे काम कॅफे हाऊस या माध्यमातून सुरू आहे. हे कॅफे हाऊस नसून छोटे छोटे लॉजिंग असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पडदे लावून आत मध्ये सोफा,किंवा आराम करण्याचे छोटे छोटे बेड सारख्या सुविधा देऊन नेमकं काय चालतंय हे आता सांगण्याची गरज नाही.
सर्वच कॅफे हाऊस मध्ये असे प्रकार चालत नाहीत मात्र काही ठराविक कॅफे हाऊस मध्ये मात्र हे प्रकार सर्रास सुरू आहेत आणि हे पोलिसांना ही माहित आहे.

काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील तोफखाना पोलिसांनी पाच कॅफे हाऊस वर कारवाई केली मात्र ही कारवाई फक्त दाखवण्यापूर्ती झाली काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण काही तासांमध्येच हे कॅफे पुन्हा त्याचप्रमाणे सुरू असून जोडप्यांना एकांत मिळावा यासाठी या कॅफे हाऊसमध्ये चांगली सोय करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हुक्का पार्लरची ही सोय करण्यात आलेली असते. ही कॅफे हाऊस संस्कृती आता नगरमध्ये चांगलीच फोफावली असून नगर शहरात विविध ठिकाणी कॅफे हाऊस नावाखाली छोटे छोटे लॉजिंग सुरू झाले आहेत. ज्यामुळे तरुण-तरुणींना एकांत मिळतो मात्र याचबरोबर शाळेतील लहान लहान मुलेही या कॅफे हाऊसमध्ये जाताना दिसत असल्याने हा प्रकार गंभीर आहे. सुरुवातीला उत्सुकता म्हणून या कॅफे हाऊसकडे पाय वळतात आणि नंतर यामधून अनेक धक्कादायक आणि गंभीर परिणाम समोर येत आहेत. दोनशे ते तीनशे रुपये तासाने या कॅफे हाऊसमध्ये तरुणांना एकांत मिळतो विशेष म्हणजे यामध्ये शाळेच्या गणवेशावरच मुलं-मुली जात असल्याने ही बाब गंभीर असून असे कॅफे हाऊस पोलिसांनी उद्ध्वस्त करून टाकने गरजेचे आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये कशाप्रकारे अंधुक प्रकाशात भयानक सत्य सुरू असते याचा उलगडा पोलिसांनी केला होता त्याचप्रमाणे आता नगर शहरातही पोलिसांनी हे कॅफे हाऊसचे सत्य समोर आणून कॅफे हाऊस मधील बंद दरवाजाचे सर्व कारणामे उद्ध्वस्त करण्यात गरजेचे आहे. तरच येणारी पिढी आपण याच्या पासून दूर ठेवू शकतो.


कॅफे हाऊस वाले एवढे निर्ढवलेले आहेत की पोलिसांनी छापा टाकूनही यांनी आपले धंदे सुरूच ठेवले आहेत. मध्यंतरी नगरमध्ये जे छापे पडले त्या छाप्यामध्ये मूळ मालकांना आरोपी न करता त्या ठिकाणी कामाला असलेले आणि परप्रांतीय लोकांना मालक म्हणून आणि चालक म्हणून दाखवण्यात आले आहे कोणी वेटर आहे तर कोणी हातगाडीवाला आहे असे आरोपी पोलिसांनीही करून घेतले हे विशेष यावरूनच या कॅफे हाऊस चालकांचे हात किती वर पर्यंत पोहोचले आहेत हे दिसून येते.मात्र हे होत असताना उद्या अशा धंद्यांना आश्रय देत असलेल्या लोकांचे मुलगा किंवा मुलगी या कॅफेस मध्ये गेला आणि त्याच्यातून काही चुकीचे घडले तर तेव्हा त्या लोकांचे किंवा पोलिसांचे डोळे उघडणार का ? असा जळजळीत सवाल आता सामान्य नागरिक उपस्थित करू लागला आहे.
पैसे कुठे आणि किती खायचे याचेही काहीतरी मापदंड ठरलेले असतात मात्र उद्या हप्ते खाऊन असे अवैद्य धंद्यांना जर कोणी अभय देत असेल तर उद्या त्यांच्या घरातील मुलं मुली सुद्धा व्यसनांच्या किंवा कॅफे हाऊस मध्ये नको ते करत असताना पकडले गेले तर त्यांनीही आश्चर्य मानू नये कारण हप्ते खाताना त्यांनी आपल्या मुलांच्याही हफ्ते खाल्ले आहे असेच समजावे आणि कारवाई करावी.(सु थो)

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular