Homeशहर२४ दिवसानंतर नगर शहरातील साखळी उपोषण सुटले 20 जानेवारीच्या सभेसाठी अहमदनगर शहरातून...

२४ दिवसानंतर नगर शहरातील साखळी उपोषण सुटले 20 जानेवारीच्या सभेसाठी अहमदनगर शहरातून लाखो मराठा बांधव जाणार मुंबईला

advertisement

अहमदनगर दि.24 डिसेंबर

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता गेल्या 24 दिवसांपासून नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर मराठा बांधवांतर्फे साखळी उपोषण सुरू होते 24 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली अंतिम तारीख होती मात्र त्या आधीच सरकारचे शिष्ट मंडळ मनोज दरांगे पाटील यांच्या भेटीला येऊन अजून काही दिवस मिळावेत यासाठी म्हणून पाटील यांच्याकडे विनंती केली होती 24 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे झालेल्या भव्य सभेमध्ये येत्या 20 जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केले आहे. या मधील काळामध्ये सर्व बांधवांनी आपली शेतीतील आणि सर्व कामे उरकून कोट्यावधी मराठ्यांनी मुंबईमध्ये येऊन आजाद मैदानात उपोषण करण्याचा आवहान मनोज जरांगे पाटील यांनी केल्यामुळे अहमदनगर येथील साखळी उपोषण आज सोडण्यात आले पुढील दिशा आणि जानेवारीच्या तयारीसाठी हे उपोषण थांबवत असल्याचं मराठा बांधवांनी सांगितले आहे.

या 24 दिवसांच्या साखळी उपोषणात सहभागी झालेले वारकरी भजनी मंडळी, नगर शहरातील उद्योजक, अधिकारी, वकील , डॉक्टर , मेडिकल, नोकरदार, कष्टकरी शेतकरी, महिला, बालक, सेवा निवृत्त अधिकारी, वयोवृद्ध या सर्वांनी सहभाग नोंदवला होता त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
२० जानेवारी रोजी अहमदनगर शहरातून लाखो मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत यासाठी आता पुढील रणनीती ठरवण्यासाठी हे साखळी उपोषण थांबवण्यात आले असून सरकारला जाग आणण्यासाठी 20 जानेवारी रोजी मराठ्यांचं भगवे वादळ पुन्हा मुंबईकडे कूच करणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular