Homeक्राईमअहिल्यानगर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या...

अहिल्यानगर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या द परफेक्ट कॅफे,बेलाचाव कॅफे,आँरिगेनो कॅफे,झेड के कॅफे,वननेस अशा पाच कॅफेंवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे…

advertisement

अहिल्यानगर 30 एप्रिल

अहिल्या नगर शहरात कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींना आणि शालेय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलिया करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे यांनी एक पथक स्थापन करून नगर शहरातील कॅफेंची तपासणी केली असता अनेक ठिकाणी धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रत्यक्ष जाऊन तपासणी केलेल्या नगर कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे, सारसनगर ते वाकोडी जाणारे रोडलगत बेलाचाव कॅफे, सावेडी गावातील पंपींग स्टेशनजवळील असलेल्या आँरिगेनो कॅफे, कोहिनूर मॉलजवळील झेड के कॅफे आणि स्टेट बँक चौक, येथील वननेस कॅफे अशा ठिकाणी तरुण मुल मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावुन कुठलीही कॉफी, पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले.

या सर्व प्रकारानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सर्व कॅफे चालकांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत या मध्ये महेश पोपट खराडे, वय 23, रा.नालेगाव, अहिल्यानगर (परफेक्ट कॅफे) 2) आसिफ आयाज शेख, वय 26, रा.भोसले आखाडा, बुरूडगाव, अहिल्यानगर 3) विशाल विष्णु वाघ, वय 18, रा.बुरूडगाव रोड, अहिल्यानगर 4) मंगेश भरत आजबे, वय 19, रा.बुरूडगाव रोड, अहिल्यानगर 5) महेश शंकर दरंदले, रा.चिपाडेमळा, अहिल्यानगर फरार (बेलाचाव कॅफे) 6) अविनाश विलास ताठे, वय 32, रा. ताठेनगर, सावेडी, अहिल्यानगर (ऑरिगेनो कॅफे) 7) मंगेश रमेश देठे, वय 19, रा. भगवती कोल्हार, ता.राहाता, जि.अहिल्यानगर 8) महेश सातपुते, रा.अहिल्यानगर फरार (झेडके कॅफे)9) कृष्णा अनिल कराळे, वय 19, रा.तपोवन रोड, ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे, अहिल्यानगर (वननेस कॅफे) यांचेविरूध्द कारवाई करुन कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) प्रमाणे 05 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, जालींदर माने, मयुर गायकवाड, भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर, ज्योती शिंदे यांनी केली

पोलिसांनी ज्यावेळेस कॅफेन वर छापे टाकले त्यावेळेस तेथे आढळून आलेल्या तरुण-तरुणींना समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र पालकांनी हे आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपला मुलगा अथवा मुलगी कोणत्या मित्रांबरोबर फिरतो याची चौकशी करणे गरजेचे असल्याने पालकांनी सुद्धा यावर लक्ष ठेवणे तेवढेच गरजेचे आहे.

.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular