अहमदनगर दि.१९ डिसेंबर
अहमदनगर शहरात धूम स्टाईलने मोटरसायकल वर येऊन चैन स्नॅचिंग चोरांनी धुमाकूळ घातला असून एकाच दिवशी तीन ठिकाणी मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या असून या चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. मध्यंतरी बंद झालेल्या या मंगळसूत्र चोरांचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला आहे.
सावेडी परिसरात असलेल्या सोना नगर परिसरात राहणाऱ्या पुष्पावती ठमके या आपल्या नातवाला फिरायला घेऊन गेले असताना सोना नगर पार्क परिसरात त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण अज्ञात चोरट्याने पळवून नेले.
तर दुसरी घटना लक्ष्मी उद्यान परिसरात वनिता सुभाष जोशी यांच्या सोबत घडली असून जोशी आपल्या मैत्रिणीबरोबर भुतकरवाडी परिसरातील महालक्ष्मी उद्यान परिसरात फिरायला जाऊन येत असताना त्यांच्या गळ्यातील 11 ग्रम वजनाची ओम चे पदक असलेली सोन्याची चैन दुचाकीवर आलेल्या चोरट्याने बळजबरीने ओढली मात्र चोरट्यामध्ये आणि वनिता जोशी यांच्यामध्ये झटापट झाली यामध्ये चोरट्याने हातात असलेल्या चैनेचा तुकडा घेऊन मोटरसायकल वरून पळ काढला
तिसरी घटना शोभा सुधाकर कल्हापुरे यांच्या सामवेत घडली असून कल्हापूरे या भाजी आणण्यासाठी दुचाकीवर पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकामध्ये आल्या होत्या तिथून भाजी घेऊन त्या पुन्हा घराकडे जात असताना साहेबा बेकरी समोर मागून मोटार सायकल वर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चैनितील मिनीगंठन ओढून नेले.
या तिन्ही प्रकरणात पुष्पावती पंडीतराव ठमके यांच्या
गळ्यात घातलेले सोन्याचे चैनितील मिनी गंठन45,000/- रुपये किंमतीचे 20 ग्रम वजनाचे मिनी गंठन वनिता सुभाष जोशी यांच्या गळ्यात घातलेली मध्यभागी ओम असलेली चैनचा 7 ग्रम वजन असलेला अर्धा भाग 18,000/- रुपये किंमतीचे 11 ग्रॅम वजनाचे चैन आणि शोभा सुधाकर कल्हापुरे यांच्या गळ्यातील सोन्याचे 45,000 किमतीचे मिनी गंठन असा एक लाख आठ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी एका दिवसात झाली आहे. तिन्ही घटना या तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून या तिन्ही प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.