HomeUncategorizedजिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विषारी गुटखा येतोच कसा ? अपयश नेमकं कोणाचं? पोलीस...

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विषारी गुटखा येतोच कसा ? अपयश नेमकं कोणाचं? पोलीस की अन्न औषध प्रशासन तरुणांना विषारी गुटखा खाऊ घालणाऱ्यांच्या मुसक्या आवळा

advertisement

अहमदनगर दि.१९ डिसेंबर
तंबाखू सेवनामुळे कर्क रोग होऊन भारतामध्ये रोज 2000 ते 2300 लोक मृत्युमुखी पडतात तंबाखू. तंबाखू सेवन म्हणजे गुटखा, मावा आणि तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये येणारे सर्वच घटक आहेत. तंबाखू सेवनामुळे मुखाचा कर्करोग तर होतोच मात्र याचा परिणाम आपल्या शरीरातील 40 अवयवांवर होऊ शकतो आणि त्यामुळे तंबाखू सेवनामुळे फक्त मुखाचा नाही तर वेगवेगळ्या अवयवांना कर्करोग होऊ शकतो. अशी माहिती कर्करोग तज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे यांनी दिली आहे.

याच कारणामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना गुटखाबंदी कायदा करून महाराष्ट्र मध्ये गुटखा विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अद्यापही ही गुटखाबंदी कागदावरच असल्यासारखं दिसून येत आहे. कारण प्रत्येक गावाच्या प्रत्येक टपरीवर  बंदी असलेले सर्वच गुटके सहजरित्या उपलब्ध होतात. मग गुटखाबंदी फक्त नावापुरतीच होती का असा प्रश्न उभा राहतो. बर हा गुटका परराज्यातून येतो असं बोललं जाते मग परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करताना अशा गाड्यांची तपासणी होत नसेल का? होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष का केले जाते आणि यामागे असा कोणता मोठा मसिहा आहे की या विषारी गुटख्याला हा थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो.

या गुटखा विक्रेत्याची चैन खूप मोठी आहे असं नेहमीच बोललं जातं अहमदनगर शहरात याआधीही करोडो रुपयांचा गुटखा पकडला गेला होता. मात्र या गुटक्याचा मालक कोण आणि हा गुटखा कोणी आणला यापर्यंत पोलीस पोहोचू शकत नाहीत गुटखा रेड पडली की पोलिसांवर प्रचंड दबाव येतो असं बोललं जातं मग हा दबाव नेमका टाकतो कोण? या साखळीत मध्ये नेमकं जोडले कोण असे अनेक प्रश्न आता समोर येऊ लागले आहेत.

लाखो जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गुटक्याला कायमचा हद्दपार करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. मात्र यामधून पळवाट काढून हा गुटखा राजरोस तरुणांच्या तोंडामध्ये रोज आपल्याला पाहायला मिळतोय कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये गेले तर भिंती लाल रंगाने रंगलेल्या असतात त्या याच गुटख्या खाल्ल्यामुळे आज तरुणांच्या तोंडामध्ये हा विषारी पदार्थ कोण घालतोय थोड्याशा पैशांसाठी आपण आपल्या तरुणांचे आयुष्य बरबाद करतोय.

नगर शहरातील पान दुकानावर खुलेआम गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ मावा विकला जातो यावर कारवाई करण्याची पहिली जबाबदारी ही अन्न आणि औषध प्रशासनाचे आहे मात्र नेहमीच कमी मनुष्यबळ असल्याचा आव आणून हे प्रशासन अंग झटकून मोकळे होते. पोलीस कारवाई करतात मात्र फिर्यादी अन्न औषध प्रशासनाला व्हावे लागते. मात्र या गुटखा तस्करीच्या मुळापर्यंत पोलीस का जात नाही हा एक मोठा प्रश्न पडतो. अहमदनगर शहरात दोन दिवसापूर्वी दहा लाख रुपयांचा गुटखा पकडला हा पार थोडा माल असला तरी या प्रकरणाचा तपास तीन वेळा बदलला गेल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. आणि यामुळे पोलिसांवरच संशयाची सुई  फिरू लागली आहे तोफखाना पोलीस कोतवाली पोलीस तपासासाठी सक्षम नव्हते का?  हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होतेय. तपास कोणाकडेही असावा मात्र तपास शेवटपर्यंत होणे गरजेचे आहे. यातील मूळ आरोपी अटक होणे गरजेचे आहे. कारण आजकाल तरुणांना आपण विष खाऊ घालतोय हे अजूनही कोणाला समजत नाही या गुटखा तस्करीला जे जे पाठबळ देतात पाठीशी घालतात ते सर्वच या तरुणांचे अपराधी आहेत कारण यांच्यामुळेच हे तरुण व्यसनाधीन होऊन भविष्यात यांना कर्करोग होऊ शकतो याला जबाबदार गुटखा विकणारे जेवढे आहेत तेवढेच त्यांना पाठीशी घालणारे ही आहेत.

पोलिसांनी ठरवलं तर शहरातील सुई सुद्धा चोरी जाऊ शकत नाही असं नेहमीच बोललं जातं मग मोठ्या प्रमाणात विषारी गुटखा शहरात येतच कसा हे पोलिसांचा अपयश म्हणावं का? की अन्न औषध प्रशासनाचा अपयश म्हणावं नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पदभार घेतल्यानंतर ज्याप्रकारे अवैध वाळू तस्करी आणि गोमांस तस्करी हातभट्टी दारू विकणारे यांच्या सारख्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्याचप्रमाणे आता अधीक्षकांनी अवैद्य गुटखा विरोधात उतरून तरुणांचे आयुष्य वाचवण्यासाठी पुढाकार घेऊन ही अवैध गुटखा तस्करी समूळ नष्ट करावी अशीच अपेक्षा अहमदनगर जिल्हा वासियांची आहे.

अहमदनगर शहरातील पकडलेला दहा लाखांच्या गुटख्याचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे गेला आहे जर स्थानिक गुन्हे शाखेने ठरवलं तर ते या तस्करीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकतात मात्र आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी यामध्ये सखोल तपास करून कायमस्वरूपी ही गुटखा तस्करी मोडून काढावी आणि तरुणांना व्यसनधिन होण्यापासून वाचवावे नक्कीच त्यांना अनेक आई-वडिलांची दुवा लागू शकते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular