HomeUncategorizedचाणक्य चौकात मारहाण करणारे आरोपी कोतवाली पोलिसांकडून तीन तासात जेरबंद

चाणक्य चौकात मारहाण करणारे आरोपी कोतवाली पोलिसांकडून तीन तासात जेरबंद

advertisement

अहमदनगर दि.२४ जुलै
अहमदनगर शहरातील चाणक्य चौक परिसरात काही तासांपूर्वी एका तरुणावर हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या घटनेची हकीगत अशी की फ्रान्सिस विलास उबाळे राहणार पंचशील वाडी रेल्वे स्टेशन अहमदनगर हे मोटरसायकल वरून चालला असताना चाणक्य चौकाच्या जवळ समोरून येणाऱ्या अनोळखी मुलांचा धक्का त्यांच्या गाडीला लागला. त्यावरून त्या ठिकाणी वाद झाला. वाद झाल्यानंतर आरोपींनी विटांनी मारहाण केली आणि आरोपी विशाल भंडारे याने त्याच्याकडील छोट्या चाकूने फ्रान्सिस उबाळे यांना पोटावर चाकूने मारले होते. ही घटना कळताच कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे गुन्हे शोध पथक आणि तपास पथकासह तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि माहितीवरून आरोपींची नावं निष्पन्न केली.

या गुन्ह्यात सारस नगर मधील शुभम धुमाळ नगर मधील संकेत खापरे,विशाल भंडारी,गोविंद पवार आणि इतर दोन असे सहा आरोपी असल्याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली होती यावरून कोतवाली पोलिसांनी चार आरोपींना तीन तासात अटक केली आहे.तर विशाल भंडारी किरकोळ जखमी असून उपचार कामी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे मनोज कचरे पोलीस जवान शाहिद शेख रवी टकले प्रमोद लहारे सुमित गवळी यांनी केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular