Home राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर दौऱ्यावर ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर दौऱ्यावर ?

अहमदनगर दि.२१ सप्टेंबर-

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या शुभारंभाचा मुहूर्त ठरला असून, 23 सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आष्टीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. तर आष्टी मध्ये 23 तारखेला सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहमदनगर मार्गे बीड कडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर शहरात येणार असून शहरात ते मुक्कामी राहणार असल्याची माहिती मिळत आहे.मुख्यमंत्री झाल्या नंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दौरा असेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version