Home राजकारण अडीच वर्षात आम्ही सत्तेत असूनही नसल्या सारखे होतो त्यामुळेच आम्ही चाळीस...

अडीच वर्षात आम्ही सत्तेत असूनही नसल्या सारखे होतो त्यामुळेच आम्ही चाळीस जणांनी एकनाथ शिंदे यांना गुहाटीला घेऊन गेलो होतो.

अहमदनगर दि.२१ सप्टेंबर –
अहमदनगर शहरात आज शिंदे गटाची हिंदु गर्व गर्जना शिवसेना संपर्क यात्रा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली.

या मेळाव्या आधी शासकीय विश्रामगृह ते नक्षत्र लॉन पर्यंत दुचाकी वर भगवे झेंडे हातात घेऊन रॅली काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून ही रॅली सभा स्थळी रवाना झाली .

कार्यक्रमाच्या सुरवातीलाच अहमदनगर दक्षिण आणि उत्तर भागातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश केला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी प्रास्तविक करताना सांगितले की लवकरच आठ ते दहा नगरसेवक आपल्यात लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये  प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ज्यावेळेस उद्धव ठाकरे गेले ते आमच्या मनाला ते पटलं नव्हतं आणि कोणत्याच शिवसैनिकाच्या मनाला पटलं नव्हतं लोक फक्त शरीराने तिकडे साहेब आजही कोण कोण पदावर आहेत त्यांची भरपूर लोकांची येण्याची इच्छा आहे आतून सर्वांची इच्छा आपल्याकडे घेण्याची कारण सगळ्यांना माहिती आहे की  हिंदुत्ववादी विचारला घेऊन चालणारी सेना कोणती आहे भाजप आणि सेना ही नैसर्गिक युती आहे मागील अडीच वर्षांमध्ये कोणाचेच काम होत नव्हते आमच्या गोरगरीब कार्यकर्त्यांवर या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी खूप  त्रास दिलेला आहे मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या पासुन  दोन अडीच तीन महिन्याच्या कालावधीत आपण साहेब 750 जीआर ला एक एक दीड दीड वर्ष लागतात ते 750 जीआर आपले शिंदे साहेबांचे आणि सर्व मंत्र्यांनी काढले असून कामाचा वेग पाहता पुढील पाच दहा वर्षात आपले सरकार राहण्याचा विश्वास सचिन जाधव यांनी व्यक्त केला अहमदनगर जिल्ह्यात अनेक शिवसैनिक आता शिंदे गटात येण्याचे चूक असून कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आपल्याकडे रांग लागेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खा. सदाशिव लोखंडे यांनी या वेळी बोलताना सांगितले की मागील काळात  मुख्यमंत्री आपला होता मात्र राज्यात आघाडी सरकार होतं आता युतीचे सरकार आहे. आपल्याला भारतीय जनता पक्षाचे सहकार्य घ्यावे लागेल पण सहकार्य घेत असताना आपल्याला कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम  सर्वांनी करणे गरजेचे आहे  हा कार्यक्रम घेण्याचे भूमिका ह्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आपल्याला इकडे दसरा मेळावा घ्यायचा आणि दसरा मेळाव्याची तयारी आपल्या जिल्ह्यातून झाली पाहिजे आणि जिल्ह्यातून  वाजत गाजत आपण ज्यावेळेस गावातून निघू  मुंबईला जाऊ मुंबईतून आल्यानंतर आपल्या गावच्या काय काय समस्या असतील ते सोडवण्याचा आपण पाईक झालो पाहिजे.  देसाई साहेबांनी  आपण अनेक वर्ष साताऱ्या सारख्या भागामध्ये बागायत पट्ट्यामध्ये आमदार होतात मंत्री होतात या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला इकडे पाठवले अहमदनगर जिल्ह शिवसेनेच्या वतीने हा जिल्ह्याचे नेतृत्व  त्यांना आपल्याला द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे करणार असल्याच खा. लोखंडे यांनी सांगितले.

शंभूराज देसाई

एकनाथजी शिंदे साहेबांच्या खांद्यावर आमची मान ठेवली होती आणि तो खांदा एवढा मजबूत होता की आम्ही मनामध्ये ठरवलं होतं की एकदा सुरतच्या दिशेने हे जे पाऊल पुढे पडले ते शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करूनच महाराष्ट्रात परत येणार याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री होण्याआधी आघाडी सरकार मध्ये काय त्रास होत होता आज आठवण येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पडलेल्या आमदारांची कामे होत होती मात्र आमच्या सारख्या मंत्र्यांची कामे होत नव्हती एकनाथ शिंदे यांना आम्हाला नाही आम्ही चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना गुहाटीला घेऊन गेलो होतो.या प्रसंगी बोलताना देसाई यांनी स्व. माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांची आठवण काढली त्यांच्या बरोबर आमदार म्हणून काम केलं त्यांनी मला एका कार्यकर्त्याच्या कामासाठी फोन केला होता ते तळमळीने काम करत होते नगर मध्ये आल्यावर त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे या अगोदर दसरा मेळावे झाले ना एक फोन ना निमंत्रण दसरा मेळाव्याला फोन करायची गरज लागत नव्हती आपल्याला कुणाला दसरा मेळावा आहे म्हणले की आपल्या गाड्या भरायचे आपली माणसं भरायची मिळेल तिथे जागा धरायची साहेब मोठया साहेबांचं  बाळासाहेब ठाकरे साहेबांचे भाषण ऐकायचं साहेबांनी भाषण संपलं की निघून माघारी घराकडे यायचं त्यासाठी काय मेळावा घ्यायला लागत नव्हता फोन करायला लागत नव्हता तुम्हीच विचार करा  दसऱ्या मेळाव्याचं नियोजन करण्यासाठी गर्दी जमवण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांना मुंबईतल्या गट प्रमुखांचा मेळावा घ्यावा लागला. मला वाटतं पहिल्यांदा घडलं असेल की पक्षामध्ये स्वतः पक्ष प्रमुख अशा पद्धतीचा मेळावा घेतात याचं कारण सामान्य शिवसैनिक जो वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा पाईक आहे ज्वलंत हिंदुत्वाचा सेवक आहे तो शिवसैनिक आज उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर  राहिला तयार नाही त्याचं कारण अडीच वर्षात ज्या वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं की माझी शिवसेना ही मी कधी काँग्रेस बरोबर जाऊ देणार नाही माझ्या शिवसेनेला अशी वेळ आली तर माझ्या शिवसेनेचे दुकान बंद करू हे  शिवसेनाप्रमुखांचे या ठिकाणी शब्द आहे . अशी टीका मंत्री देसाई यांनी शंभराज देसाई यांनी केली.

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीनंतर शिंदे गटाचा मुंबईमध्ये प्रथमच मोठा मेळावा पाच ऑक्टोंबर रोजी दसरा मेळावा निमित्ताने होत आहे. यासाठी संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते या दसरा मेळाव्यात येतील याचे नियोजन करावे  असे आवहान त्यांनी केले.

या कार्यक्रमाला शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे उपजिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे शहर प्रमुख दिलीप सातपुते काका शेळके, संग्राम शेळके तसेच भिंगार शहर प्रमुख लाल बेंद्रे यांच्यासह जिल्ह्यातुन आलेले अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version