अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शना खाली शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलीस प्रशासनाला चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक संपन्न झाली. असून १५ दिवसात वाहतूक कोंडीची समस्या सोडविली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने शिष्टमंडळास दिले.
यावेळी कोतोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणाले की, शहरातील नागरिकांनी वाहतूक कोडीची समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करावे तसेच कानेटिक चौक, केडगाव वेस, माळीवाडा बस स्टॅन्ड, मार्केट यार्ड, सक्कर चौक, कोठला स्टॅन्ड, प्रोफेसर कॉलनी चौक, दिल्ली गेट, प्रेमदान चौक, भिंस्तबाग चौक परिसरामध्ये नियमित वाहतूक पोलीस ठेवले जातील. तसेच अवैद्य वाहतूक प्रवासी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच एसटी स्टँड परिसरातील ट्रॅव्हल थांबा बंद केला जाईल. शहरातील पॅगो रिक्षाला देखील शिस्त लावली जाईल या कामासाठी महापालिकेने देखील सहकार्य करण्याची गरज आहे. रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत पालिकेने कठोर कारवाई केली पाहिजे, पोलीस प्रशासन नागरिकांच्या सहकार्यातून नक्कीच वाहतुकीची शिस्त लावेल असे ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बोरसे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, नितीन घोडके, वैभव ढाकणे, जॉय लोखंडे, दीपक खेडकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील वाहतूक समस्येचा प्रश्न सुटावा यासाठी पोलीस प्रशासनाला चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज बैठक संपन्न झाली असून शहरातील वाहतूक कुंडीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. तरी येत्या १५ दिवसात मार्गी न लावल्यास चक्काजाम केला जाईल. बैठकीमध्ये वाहतुकीच्या समस्या बाबत चर्चा झाली आहे शहरात गर्दीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस उभे राहणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.