Home राजकारण शिंदे सरकार मध्ये अहमदनगर जिल्ह्यातून एका आमदारांचे नाव मंत्री मंडळात पक्के तर...

शिंदे सरकार मध्ये अहमदनगर जिल्ह्यातून एका आमदारांचे नाव मंत्री मंडळात पक्के तर महिला आमदारांना सुद्धा मिळूशकते मंत्री पदाची संधी

अहमदनगर दि. ३० जून
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठी उलथा पालथ दिसून आली आहे. आणि याचा शेवट अत्यंत धक्कादायक असा झाला असून शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस बसतील असं वाटत असतानाच खुद्द देवेंद्र फडवणीस यांनीच शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील हे सांगितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला एक धक्का बसला होता.

आता यानंतर प्रतीक्षा आहे ती एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर महाराष्ट्र विकास आघाडी मध्ये शिवसेनेच्या कोट्यातून जे मंत्री आले होते त्यांना प्राधान्य दिले जाणार असून त्यानंतर इतर आमदारांना मंत्री पदाची संधी भेटणार आहे.

तर भाजपमधूनही अनेक ज्येष्ठ आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत असताना अहमदनगर जिल्ह्यातून ज्येष्ठ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळत असून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद राधाकृष्ण विखे पाटील होतील अशी शक्यता आहे. तसेच श्रीगोंदयाचे आमदार बबनराव पाचपुते हे सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत असून त्यांच्या मागे पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांचेही नाव चर्चेत आहे.राजळे यांना मंत्रिपदाची संधी भेटल्यास अहमदनगर जिल्ह्यात मोनिका राजळे यांच्या रूपाने प्रथमच महिला मंत्री मिळेल.

त्यामुळे आता भाजपमधून अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील, बाबुराव पाचपुते मोनिकाताई राजळे आणि आत्ताच निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे आता मंत्रीपदाची लॉटरी कोणा कोणा लागणार यासाठी सर्वच आमदारांचे कार्यकर्ते उत्सुक झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version