अहमदनगर दि.१५ सप्टेंबर
कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये अहमदनगर शहर सहकारी बँकेचे मॅनेजर दिनेश सुधाकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि न ६९० / २०२२ भादवि कलम १२० (ब), ४०९,४२०,४६५,४६८,४७१
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी आरोपी अजय किशोर कपाले, वय ३३वर्षे, धंदा गोल्ड व्हॅल्युअर, रा.बालीकाश्रम रोड, वनउदयान जवळ, इस्सार पेट्रोलपंप पासुन आतमध्ये, अहमदनगर. विशाल संजय चिपाडे, वय २८ रा. चिपाडे मळा, सारसनगर, अहमदनगर, ज्ञानेश्वर रतन कुताळ वय २८ रा. चिपाडे मळा, सारसनगर, अहमदनगर., सुनिल ज्ञानेश्वर आळकुटे वय ३८ वर्षे रा. सदगुरु टॉवर्स, गायकवाड हॉस्पीटल जवळ, तपोवन रोड, अहमदनगर यांना अटक करण्यात आली होती.
कोतवालीली पोलिसांनी तपासा दरम्यान या आरोपींकडून बेन्टेक्स दागिन्यांवर हॉलमार्क मारून डुप्लिकेट सोनं बनवणाऱ्या हॉलमार्क मशीन जप्त केली आहे. तसेच या आरोपींनी ज्या लोकांच्या नावावर बनावट कर्ज प्रकरणे केली आहेत अशा सर्व 17 कर्जदारांची नावे तपासा दरम्यान उघड झाली आहेत.
या आरोपींची आज पोलीस कस्टडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे . याच दरम्यान आता नगर शहरातील संत नागेबाबा पतसंस्थेने पोलिसांशी संपर्क साधला असून पतसंस्थेमधील काही खाते तपासणीसाठी कोतवाली पोलीस जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर शहर सहकारी बँकेमधील काही संशयीत खात्यांची तपासणी कोतवाली पोलीस करत आहेत .
सदरचा तपास व कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभ
कुमार अग्रवाल उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि संपतराव
शिंदे सो यांचे आदेशाने पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे साो, पोकों १४६४/ अभय कदम, पोना ५४०/ बापुसाहेब गोरे, पोकॉ २१३१/ गणेश ढोबळे, पोहेकॉ ३९९/दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना१३८१/ सलिम शेख, पोना १९००/ बंडू भागवत, पोकॉ १७६१/ सुमित गवळी, पोकॉ २५७१/ अतुल काजळे हे करत आहेत.