अहमदनगर दि.१३ सप्टेंबर
कोतवाली पोलीस स्टेशन (kotwali polis ) मध्ये अहमदनगर शहर सहकारी बँकेचे (shahar sahakari bank) मॅनेजर दिनेश सुधाकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा (fir) रजि न ६९० / २०२२ भादवि(IPC) कलम १२० (ब), ४०९,४२०,४६५,४६८,४७१
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी आरोपी अजय किशोर कपाले, वय ३३वर्षे, धंदा गोल्ड व्हॅल्युअर, रा.बालीकाश्रम रोड, वनउदयान जवळ, इस्सार पेट्रोलपंप पासुन आतमध्ये, अहमदनगर. विशाल संजय चिपाडे, वय २८ रा. चिपाडे मळा, सारसनगर, अहमदनगर, ज्ञानेश्वर रतन कुताळ वय २८ रा. चिपाडे मळा, सारसनगर, अहमदनगर., सुनिल ज्ञानेश्वर आळकुटे वय ३८ वर्षे रा. सदगुरु टॉवर्स, गायकवाड हॉस्पीटल जवळ, तपोवन रोड, अहमदनगर यांना अटक करण्यात आली आहे. यामधील आरोपी पैकी आरोपी क्र ०२ ते ०४ यांचे शहर सहाकरी बॅक, सक्कर चौक शाखा, अहमदनगर येथे सोने तारण खाते सरकारमान्य गोल्ड व्हॅल्युअर यांचेकडुन तपासले असता ते बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच तपासादम्यान अटक आरोपीतांनी संगणमताने कट रचुन नमुद बॅकेतील इतर खातेधाराच्या नावावर देखील बनावट सोने तारण प्रकरणे केली असल्याचे सांगितल्याने
०१) उस्मान अजिज तांबोळी, ०२) साजीद अजित तांबोळी,०३) जैन्नुदीन पापामिया पठाण, ०४)
अभिषेक पांडुरंग चौगुले, ०५) राहुल सुधाकर शिंदे,०६) यासिन नासर आरब,०७) वसीम निसार शेख, ०८) अनिल मल्लेश दिकोंडा, ०९) दिपक विरबहाददुर राजपुत, १०) महेश प्रदिप पालवे, ११) मयुर सुरेश बुळे, १२) सतिश रामदा पडोळे,१३) कालीदास सोन्याबापु कोकरे,१४) विराज सुनिल ढोरे, १५) संदीप सिताराम कदम, १६) चेतन चोरडीया, १७) अल्का चोरडीया यांचे वर नमुद शाखेमध्ये बनावट सोने तारण कर्ज प्रकरण खाते चेक केले असता सदरच्या सोने तारण ठेवी हया बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तसेच दि. १० सप्टेंबर रोजी आरोपी क्र ०१ ते ०४ यांचे कटात सहभागी असणारा आरोपी संदीप सिताराम कदम रा. निमगांव वाघा, ता. नगर, जि. अहमदनगर यास अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी क्र ०१ ते ०४ यांच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये दि. ११/०९/२०२२ रोजी पंचासमक्ष घरझडत्या घेतल्या असता त्यांचे घरझतीमध्ये शहर सहकारी बॅंक, श्री. संत नागेबाब पंतसंस्था केडगांव शखा, महात्मा फुले पतसंस्था आलमगिर या शाखेतील सोने तारण कर्ज पावत्या मिळुन आल्याने त्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मुख्य आरोपी अजय कपाले यांचेकडुन दि ११/०९/२०२२ रोजी बनावट सोन्यावर हॉलमार्कचा शिक्का मारण्याचे मशिन व बनावट सोने हे केडगाव येथील एका भाडोत्री गाळयामधुन जप्त करण्यात आले आहे .
तसेच आरोपी क्र ०१ ते ५ यांचे कटात सहभागी असणारा आरोपी श्रीतेश रमेश पानपाटील रा. भिंगार यास दि. ११/०९/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात कटात सहभागी असणारे एकुण ०६ आरोपी हे अटक असुन आरोपी यांना दि १५/०९/२०२२ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मा. न्यायालयाने दिलेला आहे. तसेच इतर बनावट सोने असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झालेल्या आरोपीतांकडे तपास चालु आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे हे करीत आहेत.
तसेच आजपर्यंतच्या तपासामध्ये वरील नमुद आरोपीतांनी एकुण ५९२६ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून २,२०,१३,०००/- रुपये इतकी रक्कम कर्ज स्वरुपात प्राप्त करुन बँकेची फसवणूक केली आहे. तसेच बँकेमध्ये त्याचे व्हॅल्युएशन रक्कम ही २,७०,३६,८४०/- रुपये अशी असल्याची माहिती प्राप्त आहे.
सदरचा तपास व कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभ
कुमार अग्रवाल उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि संपतराव शिंदे सो यांचे आदेशाने पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे साो, पोकों १४६४/ अभय कदम, पोना ५४०/ बापुसाहेब गोरे, पोकॉ २१३१/ गणेश ढोबळे, पोहेकॉ ३९९/दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना१३८१/ सलिम शेख, पोना १९००/ बंडू भागवत, पोकॉ १७६१/ सुमित गवळी, पोकॉ २५७१/ अतुल काजळे यांनी केली आहे.