अहिल्यानगर
– अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातील भिंगार, एमआयडीसी तसेच नगर तालुका यांसारख्या महत्त्वाच्या व संवेदनशील पोलीस ठाण्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) प्रभारी म्हणून कामकाज पाहत असल्याने या ठिकाणी पूर्णवेळ पोलीस निरीक्षक (पीआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेली विश्व मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नावेद शेख याच्या उपस्थितीत देण्यांत आलें यावेळी जिल्हाध्यक्ष अजीम शेख, अल्ताफ शेख, सोहेल शेख, अरुण कोकडे, शरीफ सय्यद, सनाउल्लाहा तांबटकर आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, भिंगार, एमआयडीसी व नगर तालुका ही पोलीस ठाणी क्षेत्रफळ, लोकसंख्या व संवेदनशीलतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. मात्र या ठिकाणी सध्या एपीआय दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत असल्याचे दिसून येते.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी तसेच चोरी, दरोडे, खून, खंडणी, ताबामारी, बेकायदेशीर धंदे आदी गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनुभवी व वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच प्रलंबित गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भिंगार, एमआयडीसी व नगर तालुका पोलीस ठाण्यांमध्ये पूर्णवेळ पीआय दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.





