Homeशहरकेडगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची नगरसेवक...

केडगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची नगरसेवक मनोज कोतकर यांची मागणी

advertisement

अहमदनगर दि.२७ नोव्हेंबर :

केडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी आमदार संग्राम जगताप यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. याचबरोबर केडगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले व राज्याचे माजी मुख्यमंत्री कै यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा परिसराची नादुरुस्ती मोठ्या प्रमाणात झाले आहे. या परिसराचे सुशोभीकरणाचे काम मार्गी लागणे गरजेचे होते यासाठी महापालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र वेळेवर निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे या कामासाठी खाजगी व्यवसायिकाकडे विनंती केल्यानंतर त्यांनी तातडीने या कामालाही निधी उपलब्ध करून दिला आहे. याच बरोबर केडगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी केली त्यावेळी उपमहापौर गणेश भोसले यांनी तातडीने या कामासाठी शहर अभियंता सुरेश इथापे यांना सूचना देऊन प्रस्ताव तयार करण्याचे आदेश यावेळी दिले.

 

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा केडगाव वेसी लगत आहे हा राज्य महामार्ग लगत असल्यामुळे सुशोभीकरणाचे काम करण्यास अडचण येत आहे असे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले मात्र आपण विविध विकास कामांवर मोठा निधी खर्च करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम मार्गी लागणे तितकेच महत्त्वाचे आहे तरी उपमहापौर यांनी या कामासाठी निधी उपलब्द करून दिला आहे लवकरच हे काम सुरु होणार आहे अशी माहिती मनपाच्या महासभेत नगरसेवक मनोज कोतकर यांनी दिली

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular