HomeUncategorizedदिल्ली गेट वेशीचे रूप पालटले..मात्र आता या ठिकाणी प्लीज लागणार नाही याची...

दिल्ली गेट वेशीचे रूप पालटले..मात्र आता या ठिकाणी प्लीज लागणार नाही याची काळजी महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी… ज्यांचे बोर्ड झळकतात त्यांनीही थोडी लाज बाळगावी…

advertisement

अहमदनगर दि. २६ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील दिल्ली गेटला लागलेली अनेक वर्षांची अवकाळा आता मिटली असून दिल्ली गेट चे नवीन रूप नगरकरांना पाहायला मिळतय दिल्लीगेट वेशीची रंगरंगोटी करून त्यावर ढाल तलवार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा तसेच मावळ्यांचे उभे पुतळे आणि मावळ्यांच्या हातात तुतारी आणि भगवा झेंडा मशाल लावल्याने दिल्लीगेटची शोभा वाढली आहे.


महानगरपालिकेने शहर सुशोभीकरण योजनेतून ही रंगरंगोटी आणि पुतळे बसवले आहेत मात्र आता इथून पुढच्या काळात या दिल्लीगेट वेशीवर शुभेच्छा फलक अथवा जाहिरातींचे फलक झळकू नये म्हणून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काळजी घेणे गरजेचे आहे. दिल्ली गेटवेसीवर बारा महिने कोणत्या कोणत्या नेत्याचे कार्यकर्त्यांचे वाढदिवसाचे फलक लागलेले असतात त्यामुळे दिल्ली गेट वेशीचे विद्रुपीकरण होत असतानाही महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करते. ज्या लोकांचे वाढदिवस असतात आणि दिल्ली गेट वेशीवर फ्लेक्स बोर्ड झळकत असतात त्या लोकांना सुद्धा या गोष्टीची लाज वाटत नाही की आपणच या विद्रूपीकरणाला हातभार लावत आहोत. मात्र आता दिल्लीगेट वेशीचे रूपडे पालटले असल्याने या ठिकाणी जाहिरातीचे आणि शुभेच्छांचे फ्लेक्स बोर्ड वेशीवर लागू नये अशीच अपेक्षा नगरकर करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular