अहमदनगर दि. ७ डिसेंबर
अहमदनगर शहरात कालच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन लहान मुले जखमी झाले होते या घटनेची चर्चा संपते नाही तोच नगर शहरातील गंजबाजार परिसर भागातील भाजी मंडई येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक गाय जखमी झाली आहे. मात्र या गाईला उचलण्यासाठी प्रयोजनच नसल्याने महापालिकेने हात वर केले आहे. ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले यांच्यावर हल्ले रोजच होत असताना मात्र भटक्या कुत्र्यांच्या बाबत महापालिका प्रशासन गप्प का ? हा मोठा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे ज्या ठेकेदाराला भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण्याबाबत काम दिलेले आहे ते ठेकेदाराचे काम तात्काळ थांबवावे आणि कुत्र्यांबाबत सक्षम असलेल्या ठेकेदाराला ते काम द्यावे अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे.
महानगरपालिकेच्या माध्यमातून नगर शहरातील मृत जानवारे उचलण्याचे काम होत असते.मात्र मृत झालेल्या जनावरांचे काय ? तर ते काम पशू वैद्यकीय अधिकारी हा शासनाचा वेगळा विभाग आहे त्यांच्या मार्फत जखमी जनावरे उचलून नेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी असते. त्यासाठी सहा ते सात रुग्णवाहिका त्या विभागला देण्यात आलेल्या आहेत. मात्र शासनाने दिलेल्या रुग्णवाहिका मनुष्यबळाअभावी जागेवरच उभ्या आहेत अशी माहिती मिळतेय.
या आधीही चीतळे रोडवर एका वासरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते. तर आज पुन्हा गंज बाजारात एका गायीवर हल्ला करून भटक्या कुत्र्यांनी गायीला गंभीर जखमी केले आहे. रोज हे हल्ले होत असताना महापालिका प्रशासन गप्प का? भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे काम नगर शहरातील काही ठराविक समाजाच्या व्यक्ती अत्यल्प दरात करत होते त्यांना डावलून शॉडो पार्टनरच्या दबावाखाली हे काम एका संस्थेला देण्यात आले आहे त्यामुळे या “शॉडो पार्टनरचा” पडदा फाश होणे गरजेचे आहे.
निर्बिजीकरणाचा पांढरा हत्ती महापालिका किती दिवस पोसणार यावर महापालिकेचे नगरसेवकही गप्प आहेत हे समजायला तयार नाही. जनतेच्या या गंभीर प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर उतरताना पाहायला मिळाली मात्र इतर पक्षाच्या लोकांना भटक्या कुत्र्यांचा त्रासच नाही का जनतेच्या या गंभीर प्रश्नावर त्यांना काही घेणे देणे नाही त्यामुळे इतर पक्ष या प्रश्नावर रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत असेही वाटू लागले आहे. त्यामुळे आता भटक्या कुत्र्यांच्या बाबत सर्व नगरकरांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे तरच हा प्रश्न कायमचा मिटू शकतो.