HomeUncategorizedभीम गीतांच्या कार्यक्रमात स्टेजवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा फोटो नसल्याने झालेल्या वादातून...

भीम गीतांच्या कार्यक्रमात स्टेजवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा फोटो नसल्याने झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी…

advertisement

अहमदनगर दि.१३ एप्रिल

अहमदनगर शहरातील नीलक्रांती चौकात शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरून दोन गटात चांगलेच धम्मचक्र उडाली होती मात्र पोलिसांनी वेळेत धाव घेतल्यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला नीलक्रांती चौकातील नीलक्रांती मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम गीतांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टेजवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो बरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा फोटो न दिसल्याने त्या ठिकाणी झालेल्या वादात अजय साळवे यांना तुम्ही आण्णा भाऊ साठे यांचा फोटो का ठेवला नाही याबाबत विचारणा केली असता त्याचा राग आल्याने अजय साळवे यांचा मुलगा याने फिर्यादीस स्टेजवरुन खाली ओढुन त्याचे हातातील तलवारीच्या उलट्या बाजूने फिर्यादीचे खांद्यावर मारले तसेच आरोपी गौरव साळवे याने जिवे मारण्याचे उद्देशाने त्याच्या हातातील चॉपरने डोक्यावर उजव्या बाजूला मारहाण केली असल्याची फिर्याद सुनंदा अनिल कांबळे यांनी दिली आहे.

नंदा कांबळे यांच्या फिर्यादी वरून रविराज अजय साळवे, व इतर 10 ते 12 जणविरुद्ध भा.द.विकलम 354, 143,146, 147, 148,149,427,504,506 सह आर्म अॅक्ट कलम-4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना घडल्यानंतर घटनास्थळी अहमदनगर शहराचे पोलीस उपाधीक्षकअमोल भारती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर, कोतवाली पोलीस स्टेशनच्या पीएसआय योगिता कोकाटे यांनी तातडीने धाव घेत शांतता प्रस्थापित केली. घटनास्थळी पोलीस लवकर पोहोचल्याने पुढील मोठा अनर्थ टाळला कारण दोन्ही बाजूंचे अनेक तरुण या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली होती मात्र पोलिसांनी तातडीने हालचाल करत सर्व तरुणांना हाकलून लावल्याने पुढील अनर्थ टाळला

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular