अहमदनगर दि.१३ एप्रिल
अहमदनगर शहरातील एका बांधकाम व्यवसाईकास आणि त्याच्या मुलास धमकी देऊन जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे.ताबा सोडायचा असेल असेल तर 2,00,000 रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरात जमिनी वर ताबे मारून खंडणी उकळचा हा प्रकार नवीन नाही. अशा ताबे मारण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे मात्र गुन्हे दाखल करण्याची हिम्मत जागामालक दाखवत नसल्यामुळे ताबे मारणाऱ्याचे यामध्ये फायदा होतो.
वडगाव गुप्ता परिसरात हेमचंद्र रामकृष्ण इंगळे या बांधकाम व्यवस्थेने एक मोकळी जमीन घेतली होती त्यावर सध्या प्लॉटिंग करण्याचे काम सुरू आहे. प्लॉटिंग कॉम सूर असताना त्या ठिकाणी रस्त्यावरील आणि लाईटचे पोल उभारले जात असताना नवनाथ कराळे याला मज्जाव केला तसेच ही जागा वडिलोपार्जित असून तुम्ही इथून निघून जा असे हेमचंद्र इंगळे यांना सांगितले मात्र नवनाथ कराळे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता कोणतीही कागदपत्र नवनाथ कराळे यांच्याकडून प्राप्त झाले नाही तसेच कामगारांना शिवीगाळ करणे आणि कामात अडथळा आणणे असे प्रकार सुरू असल्यामुळे हेमचंद्र इंगळे हतबल झाले होते. नवनाथ कराळे हा कोणतेही कागदपत्र दाखवत नव्हता मात्र जर तुम्हाला पुढील काम करायचं असेल आणि माझा ताबा सोडायचा असेल तर 2,00,000 रुपये इतके रक्कम मला द्यावी लागेल अन्यथा तुम्ही इथून निघून जा नाहीतर मी तुमचे हात पाय तोडेल असा दोन्ही हेमचंद्र इंगळे यांना देण्यात आला.
त्यानंतर नवनाथ कराळे याने इंगळे यांनी केलेल्या प्लॉटिंग मधील रस्ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने उखडून टाकले तसेच उभा केलेले लाईटचे बोलही तोडून टाकले.त्यानंतर इंगळे यांना आणि त्यांचा मुलगा धवल यांस वारंवार फोन करुन फोनवरुन सदर जागेचे मला पैसे दिल्या शिवाय कोणतेही कामकाज करायचे नाही असे म्हणत कराळे याने शिविगाळ व दमदाटी करण्यास सुरवात केली त्यामुळे अखेर या सर्व गोष्टींना कंटाळून हेमचंद्र इंगळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवनाथ कराळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवी कलम 385,447,427,504,506 प्रमाणे नवनाथ बाळासाहेब कराळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.