Home राजकारण रात्रीस खेळ चाले… निवडणुकीचा काळ आणि रात्रीचे धान्य वितरण.. सर्वच संशयाच्या भोवऱ्यात...

रात्रीस खेळ चाले… निवडणुकीचा काळ आणि रात्रीचे धान्य वितरण.. सर्वच संशयाच्या भोवऱ्यात धान्य वितरणाचा तो व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल..

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक 14 जानेवारी

अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आले असून उद्या मतदान आणि परवा मतमोजणी होणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवार मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करीत आहेत.

Oplus_131072

मात्र काही ठिकाणी मतदारांना प्रलोभन देऊन मतदान कडून आणण्याचा तक्रारी उमेदवार एकमेकांविरोधात करत असून सध्या संपूर्ण नगर शहरातील कट्ट्या कट्ट्यावर लक्ष्मी दर्शनाच्या चर्चेच्या फैरी चांगल्या झडत आहेत.

नेमका याच वेळेस एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यामध्ये रात्रीच्या वेळेस काही माणसे धान्य गोणी मध्ये भरत असून एका स्वस्त धान्य दुकानात हा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.आणि दुसऱ्या ठिकाणी पोहोच करण्यासाठी दुचाकीवरून तांदूळ,गहू भरलेल्या पोत्याची वाहतूक होत आहे. या व्हिडिओची तपासणी करून नेमका हा प्रकार काय आहे याची शहानिशा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये हा भाग मुकुंदनगर भागातील असल्याचे समजते आहे.त्यामुळे व्हिडिओची पुष्टी करून चौकशी होणे गरजेचे आहे. या मागे मतदारांना धान्याचे काही प्रलोभन वगैरे तर देत नसतील ना ! आणि देत असतील तर गोर गरिबांच्या ताटातला त्यांचा हक्काचा घास हिरवून घेऊन तो कोणाच्या ताटात वाढला जातोय ? या बाबतही चौकशी होणे गरजेचे आहे. ते दुकान कोणाचे आहे? व्हिडिओ मध्ये दिसणारा तो इसम कोण आहे तो रात्रीच धान्य का वितरण करतो तसेच रात्रीच्या वेळीच धान्य का बाहेर काढले जात आहे याबाबत ही चौकशी होणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version