अहमदनगर दिनांक 12 जुलै
अहमदनगर शहरातील उपनगरात असलेल्या आनंदनगर शाळेसमोरील गुलमोहर रोडवर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपी मुळे मोठी भयंकर दुर्घटना घडू शकते.याआधीही या डीपीमुळे एका बालकाचा मृत्यू झाला आहे.मात्र वीज वितरण कंपनीला अजूनही जाग आलेली नसून भर रस्त्यात असलेल्या या डीपी वरील सर्व दरवाजे उघडे असतात.
तर आज सकाळी अकराच्या दरम्यान या डीपीमध्ये मोठा स्फोट होऊन डीपी मधील आईला गळती लागली होत. मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील लोक भयभीत झाले होते. ही डीपी शाळेच्या समोरच असल्याने या डीपीच्या अवतीभवती शाळेतील मुलांचे पालक आपल्या मुलांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी येत असतात तर लहान मुलेही आपल्या पालकांची वाट या डीपीच्या अवतीभवती उभे राहून पाहत असतात त्यामुळे एखाद्या दिवशी मोठी भयंकर घटना या ठिकाणी होऊ शकते यासाठी ही डीपी स्थलांतरित करावी अन्यथा सुरक्षेसाठी उपाययोजना करून उघडी डीपी बंद करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आणि आनंद नगर विद्यालयात येणाऱ्या मुलांच्या पालकांची आहे.
डीपी रोडच्या कडेला असली तरी रोड वाइंडिंग झाल्यामुळे आता ही डीपी बऱ्यापैकी रोडमध्ये आली आहे त्यामुळे रात्री अंधारात या डीपीला धडकून एखाद्या वाहनाचा अपघातही होऊ शकतो त्यामुळे ही डीपी स्थलांतरित करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.