Homeशहरअहमदनगर महानगरपालिकेचा आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी शहरातून जाणाऱ्या वाहनांसाठी पथकर लागू करावा माजी...

अहमदनगर महानगरपालिकेचा आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी शहरातून जाणाऱ्या वाहनांसाठी पथकर लागू करावा माजी नगरसेवक दीप चव्हाण यांची मागणी

advertisement

अहमदनगर दिनांक 23 नोव्हेंबर

अहमदनगर महानगरपालिकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महानगरपालिकेवरील आस्थापने वरील खर्च भागवत असताना अहमदनगर शहरातील विकास कामांसाठी निधी देताना महानगरपालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या अनेक योजना येत असतात मात्र महानगरपालिकेच्या मद्यमातून त्यामध्ये पैसे टाकून त्या योजना पूर्ण कराव्या लागतात. मात्र महानगरपालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने अनेक योजना कागदावरच पडून राहतात.

अहमदनगर महानगरपालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्यामुळे महानगरपालिकेतील विकास काम करण्यास अनेक अडचणी उभ्या राहतात. मनपा हेड मधून कोणताही ठेकेदार काम घेण्यास धजावत नाही कारण त्याला बिल मिळण्यास अनेक वर्ष लागतात त्यामुळे मनपा हेड मधून काम करणारे ठेकेदार मनपाला भेटत नाही.

अहमदनगर शहराची आणि महानगरपालिकेची परिस्थिती पाहता अहमदनगर महानगरपालिकेने पुन्हा एकदा शहरात पथकर लागू करावा अशी मागणी अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्यासाठी अहमदनगर शहरातून प्रवेश करणाऱ्या वाहनांना प्रवेश कर लावावा की जेणेकरून महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकते आणि विकास कामांसाठी हा पैसा महानगरपालिका प्रशासन वापरू शकतो. मुंबई महानगरपालिका अधिनियमात महानगरपालिकेला तशी तरतूद असून या नियमांचा वापर करून महानगरपालिकेने आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी प्रवेश कर लागू करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे याबाबत माजी नगरसेवक दीप चव्हाण लवकरच महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेणार आहेत.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular