अहमदनगर दि.२२ नोव्हेंबर
अहमदनगर शाहरतील माळीवाडा वेशीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो सेंटरवर छापा टाकून केशव मोकाटे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे सर उपविग पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे.
याबाबत हकीकत अशी की अहमदनगर शहरातील माळीवाडा वेशी जवळ केशव मोकाटे याने एका शेडमध्ये बिंगो जुगार अड्डा सुरू केला होता. याची माहिती शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकातील हेमंत खंडागळे,पोहेकॉ सुयोग संजय सुपेकर, पोना महेश दौलत मगर, पोकॉ जालींदर अंबादास पालवे,
पोकॉ सागर राजेंद्र द्वारके त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर या पथकाने माळीवाडा वेशी जवळ असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून केशव पांडुरंग मोकाटे (वय-२३ रा. घर नं ४६५०, महात्मा फुले रोड, फुलसौंदर चौक, माळीवाडा,)(बिंगो मालक) ,कृष्णा महादेव काशीद (वय- २६ रा. शेकटे फाटा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर),अमोल अंकुश,गायकवाड (वय- २२ रा. खंडोबा मैदान, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, )शुभम कैलास काळे (वय २३ रा. कसबा पेठ, ता. पाथर्डी ) यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे