अहिल्यानगर दिनांक ४ जुलै
नगर शहरातील एका टेलर दुकानदाराच्या दुकानासमोर अघोरी विद्या करून जादू टोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.महेश सुभाष पेद्राम यांच्या दुकानासमोर हा प्रकार घडला असून सर्व प्रकार सी सी टीव्ही मध्ये कैद झाला आहे.

अंड, . काळी भाऊली, सुपारी, लिंबू, हळकुंड, मिरची असे टाकून व अंडयावर महेश पेंद्राम यांचे नांव, तसेच बायकाचे नांव, मुलीचे नांव टाकून अंडे ठेवण्यात आले होते. हळद-कुंकू, गुलाल टाकून अघोरी विद्या केल्या मुळे महेश सुभाष पेद्राम यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहे.
महेश सुभाष पेद्राम यांनी मंगळवारी अमन शिवकुमार श्रीमल यांच्यावर किरकोळ कारणातून तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये आदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात ठेवून त्यांनीच आपल्या दुकानासमोर भानामतीचा अघोरी प्रकार केला असल्याचा आरोप करून त्यांच्यावर अघोरी विदया करणे, करणी करणे, जादुटोणा करणे २०१३ कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
फॅशन मेकर्स लेडीज टेलर्स दुकानाच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमुळे श्रीमल अमन यास ओळखणे सोपे झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांपासून आपल्या जीवितला तसेच कुटुंबीयांना धोका असून यादी त्यांच्यावर तुफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र त्या गुन्ह्याचा राग घेऊनच ते अघोरी विद्या करून आपल्या कुटुंबीयांना धोका पोहोचवण्यचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप ही महेश सुभाष पेद्राम यांनी केला असून अमन श्रीमल याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पेद्राम यांनी केलीआहे.