Homeशहरमनपा आरोग्य अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतीबंधक विभागामार्फत उघड चौकशी करुन त्यांच्या विरोधात लाचलुचपत...

मनपा आरोग्य अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतीबंधक विभागामार्फत उघड चौकशी करुन त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा – तारिक आसिफ कुरेशी

advertisement

अहमदनगर दि.2 डिसेंबर

अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांची  लाचलुचपत प्रतीबंधक विभागामार्फत उघड चौकशी करुन त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी अहमदनगर शाहरतील सामाजीक कार्यकर्ते तारिक आसिफ कुरेशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांना निवेदन देऊन केली आहे.

महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी जाणीपुर्वक संगनमताने करोडे रुपयांचा भ्रष्टाचार केला असून तसेच आरोग्य विभागात कोविड-१९ च्या काळात व त्यानंतर फार मोठया प्रमाणात त्यांनी भ्रष्ट्र मार्गाचा अवलंब करुन फारमोठी माया जमवली आहे व मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार केलेला असून त्यांनी अर्थ व सांखिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन परिपत्रक दि.१०/०६/२०२१ व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि ०२/०६/२०१४ अन्वये दयावयाचे मत्ता व दायित्व चे विवरणपत्र सन २०१३ ते सन २०१३ ते २०२१-२२ चे दिलेले नाहीत. सदर बाब अतीशय गंभीर असून त्यामुळे महानगरपालिका व आरोग्य विभागात त्यामुळे मोठयाप्रमाणावर भ्रष्टाचार वाढत आहे. सदर प्रकरणी वैद्यकीय आरोग्य आधिकारी अनिल अशोक बोरगे यांनी सन २०१३ ते २०२२ पर्यंतचे मत्ता व दायित्वचे विवरणपत्र जाणिपूर्वक दिले नाहीत जेणे करुन भ्रष्टमार्गाने कमविलेले करोडो रुपयांची मालमत्ता शासनाकडे नोंद होणार नाही व शासनास घोटयाळयाबाबत माहिती होणार नाही त्यांची सदरची वर्तवणूक ही अशोभनीय आहे.

त्यामुळे शासनाची व महापालिकेची  प्रतीमा मलीन झाली आहे. त्या मूळे  वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल अशोक बोरगे यांची अतीजलद लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत उच्चस्तरिय उघड चौकशी करण्यात यावी व त्यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायदया अन्वये कठोर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

advertisement

Previous article
Next article
माजी खासदार तुकाराम गडाख पाटील यांचे निधन. आज दुपारी १२ वाजता पानसवाडी येथे होणार अंत्यविधी नेवासा दि.३ डिसेंबर -: अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम गडाख (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले. तुकाराम गडाख हे १९८९ – १९९४ मध्ये नेवासा मतदार संघाचे आमदार होते तर २००४ – इ.स. २००९ मध्ये अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार म्हणून ते निवडणून आले होते. १ नोव्हेंबर, १९५३ साली त्यांचा जन्म झाला होता.77व्या वर्षी त्यांनी अखेरच निरोप घेतलाय त्यांचा राजकीय प्रवास अपक्ष बहुजन समाज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा राहिला काही वर्षांपासून ते राजकारणापासून काहीसे दूर दिसत होते. तुकाराम गडाख यांना गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. गडाख यांच्या पार्थिवावर नेवासा तालुक्यातील पानसवाडीच्या अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular