Homeशहरदिवाळी आधीच होणार महिलांची दिवाळी...संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्या वतीने लाडकी होम...

दिवाळी आधीच होणार महिलांची दिवाळी…संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्या वतीने लाडकी होम मिनिस्टरखेळ पैठणीचा वर्षाव बक्षिसांचा कार्यक्रम…

advertisement

अहमदनगर दिनांक 25 सप्टेंबर

नगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्या वतीने लाडकी होम मिनिस्टरखेळ पैठणीचा वर्षाव बक्षिसांचा कार्यक्रम आयोजित केला असून हा कार्यक्रम सावेडी परिसरातील गंगा उद्यान समोरील मैदानावर सोमवार, ३० सप्टेंबर २०२४
संध्याकाळी ५ वाजता आयोजित केला आहे. प्रभाग क्रमांक चार मधील ज्या महिलांना या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी सहभाग नोंदवायचा असेल त्या महिलांनी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता गंगा उद्यान जवळ यावे असे आवाहन माजी नगरसेविका शोभाताई बोरकर आणि माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिला विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून
प्रथम महाविजेती होम मिनिस्टर ला सुझुकी अॅक्सेस या दुचाकीसह अकरा हजार रुपयांची पैठणी देण्यात येणार आहे द्वितीय विजेत्यास पैठणी सह फ्रिज
तृतीय विजेती महिलेस पैठणी सह 32 इंच एलईडी टीव्ही बक्षीस ठेवण्यात आला आहे. तसेच सात उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आले असून यामध्ये पैठणीसह स्मार्ट वॉच, स्मार्टफोन,कुलर, गॅस शेगडी मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्युम क्लीनर, आटा चक्की मिक्सर, ग्राइंडर, आदी भेटवस्तूंची रेलचेल असून
कार्यक्रमस्थळी सर्व महिलांची स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले असून या लकी ड्रॉमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ कूपन कार्यक्रम स्थळी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.

त्यामुळे महिलांसाठी ही एक मोठी पर्वणी असून पैठणी सह दुचाकी वाहन फ्रीज फोन टीव्ही जिंकण्यासाठी आता महिलांनी सज्ज होऊन 30 सप्टेंबर रोजी गंगा उद्यान समोरील मैदानात यावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular