अहमदनगर दिनांक २६ सप्टेंबर
119 वर्षांची परंपरा असलेली नगर शहरातील नगर अर्बन बँक बोगस कर्ज वाटप झाल्यामुळे आणि त्याची वसुली न झाल्याने अनेक घोटाळे झाल्यामुळे बंद पडले आहे मात्र या बिकट परिस्थितीमध्ये ही बँक वाचवण्याची धडपड बँक बचाव समिती करत आहे न्यायालयीन लढा बरोबर आता कर्ज वसुलीसाठीही ठेवीदारांसह बँक बचाव समितीने पाठपुरावा केल्यामुळे सध्या बँकेमध्ये असलेले आवसायक गणेश गायकवाड यांच्या आदेशाने आता कर्ज वसुली सुरू झाले आहे.
नगर अर्बन बँकेत झालेला कर्ज प्रकरण घोटाळा प्रकरणी आता अनेक संचालक जेलची हवा खात आहेत तर अनेक संचालक फरार झालेले आहेत त्यामुळे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पैसे न भरणारे थकबाकीदार आता बँकेने घेतलेल्या कटर भूमिकेमुळे पैसे भरण्यास तयार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अर्बन बँकेचे कर्मचारी सध्या स्थितीत कर्जदारांच्या घरांसमोर जाऊन ढोल ताशा सह कर्ज वसुलीसाठी धडकत असल्यामुळे अनेकांनी याची जास्ती घेतले आहे अनेक कर्जदार आता बँकेतून पैसे भरण्याची तयारी दाखवत आहे.
डोक्यावर पांढरी गांधी टोपी आणि त्यावर नगर अर्बन बँक वसुली पथक असे लीहलेल्या टोप्या घालून सध्या नगर अर्बन बँकेचे वसुली पथक कर्जदारांच्या दारात धडकत आहेत तसेच ढोल ताशांचा आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनाही ही गोष्ट कळत असल्याने आता थकीत कर्जदार स्वतःहून बँकेमध्ये धाव घेतानाचे चित्र पाहायला मिळतेय.
यानंतर आता जे थकीत कर्जदार आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहोत ही यादी नगर शहरातील प्रत्येक चौका चौकात लावण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रसिद्ध माध्यम आणि सोशल मीडियावर यादी जाहीर करण्यात येणार असल्यामुळे आता थकीत कर्जदार कोण आहेत हे सर्व नगरकरांना माहीत होणार आहे त्यामुळे अनेक कर्जदार आता कर्ज भरण्यासाठी बँकेकडे नक्कीच धाव घेतील अशी अपेक्षा ठेवीदारांना आहे.